शिवजयंती तारखेनुसार साजरी करायची की तिथीनुसार? राज्यात पेटलं राजकारण!
Shiv Jayanti: शिवजयंती तारखेनुसार साजरी करावी की तिथीनुसार याबद्दल अनेक मतमतांतरं आहेत.
Shiv Jayanti: शिवजयंती तारखेनुसार साजरी करायची की तिथीनुसार? हा वाद वर्षानुवर्ष सुरु आहे. आता सरकारने तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे पुन्हा नवीन वाद सुरु झालाय.छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे सा-या महाराष्ट्राचं दैवत... जाणता राजा... रयतेचा राजा... म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.त्यामुळे शिवाजी महाराजांची जयंतीही तेवढ्याच उत्साहात आणि जल्लोषात साजरी केली जाते.
मात्र छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यात दोन वेळा साजरी केली जाते... शिवजयंती तारखेनुसार साजरी करावी की तिथीनुसार याबद्दल अनेक मतमतांतरं आहेत. आताच्या महायुती सरकारने शिवजयंती तिथीनुसार साजरी करण्याचं ठरवलंय..
आता याच तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यावरुन वाद पेटलाय... मुनगंटीवार आपला वाढदिवस तिथीनं साजरे करतात का? असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केलाय.
शिवप्रेमींच्या मागणीनुसार शिवजयंती तिथीनुसार साजरी करण्याचा निर्णय घेतल्याचा पलटवार मुनगंटीवारांनी विरोधकांवर केलाय.
काही जण तारखेनुसार तर काही जण तिथीनुसार शिवजयंती साजरी करतात. एक शिवजयंती 19 फेब्रुवारी रोजी तर दुसरी शिवजयंती तिथीनुसार साजरी केली जाते...
राज्यातील भक्तांसाठी आनंदाची बातमी, अधिवेशनात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची घोषणा
राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी शिवजयंतीबाबतच्या तारखेच्या वादावर 1966 मध्ये तोडगा काढण्याचं ठरवलं.. मात्र दोन वेगवेगळे मतप्रवाह असल्याने शिवजयंतीची अधिकृत तारीख त्यावेळी जाहीर झाली नाही..
अधिकृत निर्णय नाही
मनोहर जोशींच्या नेतृत्त्वात युतीचं सरकार आल्यानंतर शिवजयंतीच्या तारखेवर तोडगा काढण्याचं ठरलं.. इतिहासतज्ज्ञ गजानन मेहेंदळे यांच्या अध्यक्षपदाखाली तज्ज्ञांची समिती नेमण्यात आली. तिथीप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया आणि तारखेप्रमाणे 19 फेब्रुवारी या दिवसांवर शिक्कामोर्तब झालं.. मात्र अधिकृत निर्णय झाला नाही.
विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना 2000 साली 19 फेब्रुवारीलाच शिवजयंती साजरी करण्यात येईल असा निर्णय झाला..
आणि तेव्हापासूनच राज्याचे मुख्यमंत्री 19 फेब्रुवारीला शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती साजरी करतात... पुढच्या वर्षीपासून मात्र शिवजयंती तिथीनुसार साजरी होणार आहे..
शिवजयंतीवरुन 100 वर्षांहून अधिक काळ संशोधन करण्यात आलंय. मात्र शिवाजी महाराजांची जयंती नक्की कधी साजरी करावी याबाबत दुमत आहे.