CM Tirthadarshan Yojana: राज्यातील भाविकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. पावसाठी अधिवेशनात सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात महिला, शेतकरी, विद्यार्थ्यांसाठी विविध योजना आणण्यात आल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. लाडकी बहीण, विद्यार्थी शिष्यवृत्ती अशा अनेक योजनांची घोषणा काल वित्तमंत्री अजित पवार यांनी केली. या योजनांवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये काल कलगीतुरा पहायला मिळाला. दरम्यान राज्यातील भक्तांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे.
पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील भाविकांसाठी गुड न्यूज दिली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांना इच्छा असून पैशांमुळे देवदर्शन करता येत नाही. ज्यांना परवडते ते सहकुटुंब देवदर्शनाला जातात. पण ज्यांना नाही परवडत त्यांची इच्छा अपूर्णच राहते. या भाविकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आम्ही लागू करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. लवकरच ही योजना सुरु होणार असून राज्यातील भाविकांना याचा लाभ होणार आहे. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे.
राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन’ योजना सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली.
या योजनेसाठी धोरण आणि नियमावली तयार करून ज्येष्ठांना शासनाच्या माध्यमातून तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी… pic.twitter.com/3biaAgG0Jr— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 29, 2024
याचे तिकीट दर किती असणार? मोफत असणार की त्यात शुल्क माफी असणार? या योजनेअंतर्गत कोणत्या देवस्थानांचा समावेश असणार? याचे नियोजन कसे होणार? यामुळे राज्याच्या तिजोरीवर किती भार पडणार? हे सर्व लवकरच स्पष्ट होणार आहे.
राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन’ योजना सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली.
या योजनेसाठी धोरण आणि नियमावली तयार करून ज्येष्ठांना शासनाच्या माध्यमातून तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी नेण्यात येणार आहे. आवर्तन पद्धतीने, ऑनलाईन अर्ज मागवून ही योजना राबविण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.