पुणे : "ज्या शिवसैनिकांनी (Shiv Sainik) गाडी फोडलीय त्यांचं खरंच अभिनंदन केलं पाहिजे. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. उदय सामंतांनी (Uday Samant) डेरिंगच कशी केली? आदित्य ठाकरेंची सभा पुण्यात सभा आहे म्हटल्यावर पुण्यात येण्याची डेरिंगच कशी केली.",  अशी आक्रमक प्रतिक्रिया शिवसेनेच्या समर्थकाने (Shiv Sena Supporter) या हल्ल्यानंतर दिली आहे. (shiv sainik aggresive comment after attack on eknath shinde group mla uday samant van attack at katraj pune)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामंतांवर पुण्यातील कात्रज चौकात सिग्नलवर गाडी उभी असताना हल्ला करण्यात आला.  जिथे ही घटना घडली तिथून 500 मीटर अंतरावर आज युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा होती.


शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया



"गद्दरांना क्षमा नाही. ज्या शिवसैनिकांनी (Shiv Sainik) गाडी फोडलीय त्यांचं खरंच अभिनंदन केलं पाहिजे. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आदित्य ठाकरेंची सभा पुण्यात सभा आहे म्हटल्यावर पुण्यात येण्याची डेरिंगच कशी केली. सामंतांनी डेरिंग केलीच नव्हती पाहिजे. सामंत पुण्यात आलेच नव्हते पाहिजे",अशी प्रतिक्रिया शिवसेना समर्थकाने दिली.


नक्की काय घडलं? 


सामंत शिवसेना नेते तानाजी सावंत यांच्या घराच्या दिशेने जात होते. यावेळेस त्यांचा गाड्यांचा ताफा हा सिग्नलवर थांबलेला. यावेळेस इतर 2-3  गाड्यांमधून 20-25  जण आले. या हल्लेखोरांनी मला शिवीगाळ केली. यानंतर सामंतांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांनी या हल्लेखोरांना हटकलं. 


तेव्हा या हल्लेखोरांनी हॉकी स्टीकने गाडीच्या मागील बाजूने हल्ला केला. सामंतावंर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या सर्व राड्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे गट आमनेसामने आले आहेत.