मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, जनतेने नापास केले तरी तुम्ही सत्तेत - फडणवीस
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray`s speech : मुंबईत झालेल्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. याला आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे
नागपूर : Devendra Fadnavis on Uddhav Thackeray's speech : मुंबईत झालेल्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. याला आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. जनतेने नापास करूनही तुम्ही सत्तेत आला आहोत, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधनाता म्हणाले, मुख्यमंत्र्यांचा संविधान बदलायचा मनसुबा दिसून येत आहे. हे भ्रष्ट्र सरकार आहे. काही मंत्र्यांकडे वसुलीचे सॉफ्टवेअर, असा घणाघात फडणवीस यांनी केला. (Shiv Sena Dussehra Melava : BJP leader Devendra Fadnavis criticized on Chief Minister Uddhav Thackeray's speech)
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात फडणवीस यांच्यावर कडाडून हल्लाबोल करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज प्रतिहल्ला चढवला. जनतेने नापास करूनही तुम्ही सत्तेत आहात अशी टीका फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्र्यांचा संविधान बदलायचा मनसुबा आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असे ते म्हणाले. तसेच काही मंत्र्यांकडे वसुलीचे सॉफ्टवेअर आहे, असे आयटी छाप्यात उघड झाले आहे, असे ते म्हणाले.
राज्यातील सरकार हे वरपास झाले आहे. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे नव्हते तर शिवसैनिकाला का मुख्यमंत्री बनवले नाही. तुम्ही महत्वकांक्षी आहात. नारायण राणे, राज ठाकरे यांना बाहेर का जावे लागले आहे, असा प्रश्न फडवणीस यांनी यावेळी उपस्थित केला. आम्ही महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही. ज्या बंगालमध्ये युनिनन बाजी, संपामुळेमुळे एकेकाळची आर्थिक राजधानी कोलकता मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे. Ed ,cbi चे भय ज्याने काही केले असेल त्याला असेल, अशी टीका फडणवीस यांनी केली.
कालच्या मेळाव्यात ना विचार, ना सोनं होतं. केवळ मुख्यमंत्र्यांचे फस्ट्रेशन दिसून येत होते. ज्या दिवशी सरकार पडणार त्या दिवशी कळणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. मुंबई ड्रग्सच्या विळख्यात अडकत आहे, असे सांगताना शिवसेनेने कोणच्या बाजूने आहे ते ठरवावे, असा टोला त्यांनी लगावला.