लांजा नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेला स्पष्ट बहुमत
या निवडणुकीत विद्यमान नगराध्यक्ष राजू कुरूप यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला
प्रणव पोळेकर, झी २४ तास, रत्नागिरी : लांजा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निकालामध्ये शिवसेनेने बाजी मारली असून यामध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष म्हणून मनोहर बाईत हे निवडून आले आहेत. तसेच शिवसेनेच्या ९ नगरसेवकांनी विजय मिळवला.
लांजा नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारत नगर पंचायतीत भगवा फडकवला. नगराध्यक्षपदी शिवसेनेचे मनोहर बाईत विजयी झाले असून नगर पंचायत निवडणुकीत शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळवलं. १७ नगरसेवकांपैंकी ९ नगरसेवक शिवसेनेचे विजयी झाले आहेत. तर भाजप ३, आघाडी १, अपक्ष ४ नगरसेवक विजयी झालेत. या निवडणुकीत विद्यमान नगराध्यक्ष राजू कुरूप यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला. तसेच ४ अपक्षांपैंकी २ अपक्ष हे शिवसेनेचे बंडखोर अपक्ष होते. विशेष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या ठिकाणी आघाडी करूनदेखील म्हणावं तसं यश संपादन करू शकले नाहीत. आघाडीला फक्त एका जागेवरच समाधान मानावं लागलं तर भाजपचेदेखील ३ नगरसेवक या निवडणुकीत विजयी झाले आहेत. मागच्या वेळची शिवसेनेची काठावरची सत्ता होती मात्र यावेळी शिवसेनेने स्पष्ट बहुमत मिळवत विजय संपादित केला आहे. लांज्यात शिवसेनेने जल्लोष करत फटक्यांची आतषबाजी केली.
लांजा नगरपंचायत निवडणूक निकाल
प्रभाग क्र. १ - राजेश हळदणकर (अपक्ष)
प्रभाग क्र. २ - पुर्वा मुळ्ये (शिवसेना)
प्रभाग क्र. ३ - दुर्वा शेट्ये (अपक्ष)
प्रभाग क्र. ४ - लहू कांबळे (शिवसेना)
प्रभाग क्र. ५ - मधुरा बापेकर (अपक्ष बिनविरोध)
प्रभाग क्र. ६ - प्रसाद डोर्लेकर (शिवसेना)
प्रभाग क्र. ७ - शितल सावंत (भाजप)
प्रभाग क्र. ८ - मधुरा लांजेकर (अपक्ष)
प्रभाग क्र. ९ - रफिक नेवरेकर (कॉंग्रेस)
प्रभाग क्र. १० - मंगेश लांजेकर (भाजप)
प्रभाग क्र. ११ - सोनाली गुरव (शिवसेना)
प्रभाग क्र्र. १२ - वंदना कडगाळकर (शिवसेना)
प्रभाग क्र. १३ - संजय यादव (भाजप)
प्रभाग क्र. १४ - यामिनी जोईल (शिवसेना)
प्रभाग क्र. १५ - स्वरूप गुरव (शिवसेना)
प्रभाग क्र. १६ - समृद्धी गुरव (शिवसेना)
प्रभाग क्र. १७ - सचिन डोंगरकर (शिवसेना)