मुंबई : Shiv Sena may drop Ramdas Kadam as MLC : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam ) यांना वरिष्ठांची नाराजी चांगली महाग पडण्याची शक्यता आहे. रामदास कदम यांची  आमदारकी जाण्याची शक्यता आहे. वादग्रस्त ॲाडिओ क्लिप आणि त्यानंतरच्या बॅनरबाजीने पक्षात नाराजी आहे. ही नाराजी रामदास कदम यांना चांगलीच महागात पडणार आहे. ( Shiv Sena may drop Ramdas Kadam as Member of Legislative Council)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रामदास कदम हे विधान परिषदेचे सदस्य आहेत. त्यांच्या रिकाम्या होणाऱ्या विधानपरिषदेच्या जागेसाठी नव्या उमेदवाराचा शिवसेनेत शोध सुरु झाला आहे. वादग्रस्त ॲाडिओ क्लिप आणि त्यानंतर ठाणे येथील चौकात ढाण्या वाघ, या बॅनरबाजीने पक्षात नाराजी पसरली आहे. रामदास कदम यांच्याविरोधात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते नाराज असल्याची चर्चा आहे.


रामदास कदम हे सध्या विधानपरिषदेचे आमदार असून त्यांची विधान परिषदेची मुदत जानेवारी 2022 ला संपत आहे. त्यांच्या जागी नव्या चेहरा विधान परिषदेवर पाठवण्याच्या हालचाली शिवसेेनेत सुरु आहेत. यात मुंबईचे काही विभागप्रमुख किंवा युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांची सुद्धा वर्णी लागू शकते, अशी शक्यता आहे.