Maharastra Politics: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या पुणे दौऱ्यावर (Pune News) आहेत. जागतिक मराठी साहित्य संमेलनामध्ये त्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. शोध मराठी मनाचा परिसवांदामध्ये बोलताना राज ठाकरे यांनी चौफेर टीका केली. त्यावेळी त्यांनी एक दोन उद्योग बाहेर गेल्याने फरक पडत नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राज ठाकरे यांच्यावर टीका होताना दिसत आहे. अशातच आता ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी राज ठाकरे यांना खडेबोल सुनावले आहेत.


काय म्हणाले विनायक राऊत?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरे यांनी सुपारी घेऊन बोलायचे धंदे सुरू केले आहेत. महाराष्ट्रातून (Maharastra) एक दोन नाही तर पाच मोठे उद्योग गुजरातमध्ये (Gujarat) गेले आहेत. त्या उद्योगांच्या जिवावर भाजपने गुजरातची निवडणूक जिंकली, अशी टीका विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केली आहे. राज्यातील प्रकल्प बाहेर नेले आणि महाराष्ट्राला कंगाल केलं. राज ठाकरे (Raj Thackeray) यांना त्यावर बोलायला वेळ नाही, त्यामुळे हेच मनसेचं (MNS) दुर्देव आहे, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. 


काय म्हणाले होते राज ठाकरे?


महाराष्ट्र राज्य हे सर्वार्थाने श्रीमंत आहे. महाराष्ट्राचं काय होणार? असा टाहो आपण उगाच फोडत असतो. आपल्याकडे जे आहे, ते जरी टीकवलं तरी महाराष्ट्र सर्वांच्या पुढं आहे. राज्यातून एक-दोन उद्योग बाहेर गेल्यानं महाराष्ट्राचं काहीही नुकसान होणार नाही. मात्र, आपण महाराष्ट्र जोपसणं गरजेचं असल्याचं राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी म्हटलंय.


आणखी वाचा - Santosh Bangar: शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी 100 वर्षांची परंपरा मोडली? ग्रामस्थ चिडले आणि...


दरम्यान, एखाद्या माणसाने चांगलं काम केलं त्याचं अभिनंदन करण्याचा मोकळेपणा सुद्धा तुमच्यमध्ये असला पाहिजे, असं म्हणत राज ठाकरे यांनी कुस बदलल्याचं पहायला मिळतंय. 2014 नंतर ज्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या तशा झाल्या नाही म्हणून मी लाव रे तो व्हिडीओ म्हणत सभेतून व्हिडीओ दाखवलं, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले होते.