Santosh Bangar: शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी 100 वर्षांची परंपरा मोडली? ग्रामस्थ चिडले आणि...

 हिंगोलीतील एका धार्मिक यात्रेत राजकीय पुढारी गावात आणण्याची प्रथा नाही.  असे असताना संतोष बांगर या यात्रते देवीचे दर्शन घेण्यासाठी आले होते. मात्र, ग्रामस्थांनी  संतोष बांगर यांना वेशीवरच अडवले. 

Updated: Jan 9, 2023, 10:46 AM IST
Santosh Bangar: शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी 100 वर्षांची परंपरा मोडली? ग्रामस्थ चिडले आणि...  title=

गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली : शिंदे गटाचे (Eknath Shinde Group) हिंगोली कळमनुरी विधानसभा मतदारसंघांचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. हिंगोलीतील (Hingoli News) एका धार्मिक यात्रेत राजकीय पुढारी गावात आणण्याची प्रथा नाही.  असे असताना संतोष बांगर या यात्रते देवीचे दर्शन घेण्यासाठी आले होते. मात्र, ग्रामस्थांनी  संतोष बांगर यांना वेशीवरच अडवले. हमरी तुमरी झाली तरी त्यांना गावात शिरुच दिले नाही. तरीही संतो। आमदार यांनी देवीचे दर्शन घेत 100 वर्षांची परंपरा मोडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. 

हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील वारंगा मसाई येथे दोन दिवसाची मसाई मातेची यात्रा सुरू आहे. विविध जाती धर्माचे लोक एकोप्याने लोकसहभागातून ही यात्रा मोठ्या उत्साहात पार पाडत असतात. गावात वेगवेगळ्या पक्षाचे पुढारी असल्याने कुठल्याच पुढाऱ्याला यात्रेत न बोलावण्याची जुनी गावची प्रथा आहे. 

पण, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी गावकऱ्यांना विश्वासात न घेता वारंगा येथील मासाईच्या पूजेसाठी आमदार संतोष बांगर यांना बोलावले.  इतर पक्षाचे कार्यकर्ते नाराज होऊ नये म्हणून गावकऱ्यांनी परंपरेचा दाखला देत आमदार संतोष बांगर यांना मंदिरात जाऊन मसाई देवीचे दर्शन घेण्यापासून रोखले.

यात्रा संपल्यानंतर  दर्शन घेण्यासाठी यावं अस गावकऱ्यांनी संतोष बांगर यांना सांगितले. पण, त्यानंतर दोन गटात चांगला हमरी तुमरी सुरू झाली. काही कार्यकर्ते एकमेकांवर धावून जात होते. वातावरण गरम होत असल्याचे बघून गावातील समजदार लोकांनी सामंजस्याची भूमिका घेत आमदार बांगर यांना दर्शन घेण्याची मुभा दिली. 

आमदार बांगर यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. पण, संतोष बांगर गावात येऊन गावची परंपरा खंडित करायला पाहिजे नव्हता अस गावकऱ्यांच मत होत. शंभर वर्षांपासून आम्ही गावातल्या यात्रेला कोणत्याही राजकीय पुढाऱ्याला बोलवत नाही. राजकीय पुढाऱ्याला बोलावल्यामुळे गावातील शांतता भंग होऊ शकते म्हणून आम्ही आमदार संतोष बांगर यांना दर्शन करण्यासाठी विरोध केला होता.

आमदार संतोष बांगर नेहमीच चर्चेत 

शिवसेनेचे हिंगोलीतील बंडखोर आमदार संतोष बांगर नेहमीच चर्चेत असतात. मध्यान्ह भोजनामध्ये दिल्या जाणाऱ्या वरणात अळ्या सापडल्या होत्या तेव्हा त्यांनी उपहारगृह व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली होती. ऑक्टोबरमध्ये कृषी विभागाच्या कार्यालयात राडा घातला होता. त्यांनी शोतकऱ्यांसह पिकविमा कार्यालयाची तोडफोड केली होती. बांगर यांनी विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्याला फोनवरुन मारण्याची धमकीही दिली होती. मंत्रालयात प्रवेश करताना संतोष बांगर यांनी पोलिसांना शिवीगाळ केल्याचा आरोप झाला होता. मंत्रालयाच्या गार्डन गेटमधून कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यावरुन त्यांनी गोंधळ घातल्याची चर्चा होती.