रत्नागिरी : शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमुक्ती मिळत नाही, तोपर्यंत शिवसेना गप्प बसणार नाही, अशा घोषणा देते जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडीक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हातखंबा तिठा येथे मुंबई-गोवा महामार्ग रोखला. त्यामुळे काहीकाळ येथे वाहतूक कोंडी झाली. दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आणि मार्ग मोकळा केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतकऱ्यांच्या कर्जाचा आकडा निश्चित कळावा यासाठी शिवसेना जिल्ह्यात 'कर्जमुक्तीसाठी अर्ज' अभियान राबवत आहे. या अभियानाला पाली जिल्हा परिषद गटातून सुरुवात करण्यात आलेय. या अभियानात शाखाप्रमुख ते आमदार आणि खासदार सहभागी झालेत, अशी माहिती राजेंद्र महाडीक यांनी दिली.


दरम्यान, सोमवारी करण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. लांजा, राजापूर तालुक्यात बाजारपेठा बंद होत्या. रत्नागिरीत तालुक्यात थेट आंदोलन झाले नाही तरी सेनेने सनदशीर मार्गाने या आंदोलनाला पाठिंबा दिला, असे महाडीक यांनी सांगितले.