Sanjay Raut : संजय राऊत यांचा गंभीर आरोप, `बेळगावात बोलावून मला मारण्याचा कट`
Sanjay Raut serious allegation : जत तालुक्यात झेंडे लावायला कन्नड रक्षणला राज्य सरकारमधून छुपा पाठिंबा आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांचा गंभीर केला आहे. बेळगावात बोलावून मारण्याचा कट, असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
Sanjay Raut on Maharashtra and Karnataka border dispute : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद ( Maharashtra - Karnataka border dispute) प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील (Karnataka) लोक महाराष्ट्रात (Maharashtra) येतात आणि झेंडे मिरवतात हे कर्नाटक सरकारशिवाय होणार नाही. ( Maharashtra Political News) यामध्ये महाराष्ट्रातल्या कोणाचा तरी त्याला पाठिंबा असणार, त्याशिवाय हे होणार नाही, असा आरोप ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. यावर सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. तसेच कन्नड रक्षण कार्यकर्त्यांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली आहे. या सरकारला पाठिचा कणा नाही, महाराष्ट्राचा अभिमान नाही, अशी टीका संजय राऊत (Shiv Sena Thackeray group) यांनी केली.
महाराष्ट्र सरकारवर नाराज असलेल्या सांगलीच्या जत तालुक्यातल्या विविध गावात पदयात्रा काढण्यात आली. विशेष म्हणजे गावकऱ्यांच्या हातात महाराष्ट्राचा नाही तर कर्नाटकचा ध्वज होता. पदयात्रा काढत त्यांनी कर्नाटक सरकारच्या बाजुने घोषणाबाजीही केली. 42 गावांमध्ये पाणी द्या. उच्च शिक्षणाची सोय करा. अशा विविध मागण्या या गावकऱ्यांनी केल्यात. (अधिक वाचा - Maharashtra Politics : सत्तासंघर्षावर आज सुनावणी नाही, कारण...)
संजय राऊत यांचा गंभीर आरोप
कन्नड रक्षण वेदिकेचे कार्यकर्ते सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यात आले आणि त्यांनी महाराष्ट्रात झेंडे रोवले, असा आरोप संजय राऊत यांनी केलाय. हे कर्नाटक सरकारच्या पाठिंब्याशिवाय शक्य नाही. राज्य सरकारमधील काही जणांचाही याला छुपा पाठिंबा आहे, असा आरोप राऊतांनी केलाय. समन्स देऊन आपल्याला बेळगावात बोलावून मारण्याचा कट आहे असा आरोपही त्यांनी केलाय.
सरकारला अभिमान नाही - राऊत
कर्नाटक प्रकरणावरुन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना काय वाटतं त्यांना ते विचारलं पाहिजे. ज्या दोन मंत्र्यांना सीमा भागातलं काम दिलेला आहे ते त्याबद्दल काय करणार आहेत हे त्यांना विचारलं पाहिजे. महाराष्ट्रात घुसलेले कर्नाटकी लोक परत जाण्यासाठी किंवा कर्नाटकची लढण्यासाठी परत आसामला जाऊन प्रार्थना करणार आहेत की काय, असा बोचरा सवाल राऊत यांनी केला. या सरकारला महाराष्ट्राचा अभिमान नाही त्या सरकारकडून महाराष्ट्राचा संरक्षण होणार नाही, असे ते म्हणाले.
'राजद्रोहचे गुन्हे दाखल करा'
आमच्या काश्मीरमध्ये येऊन परकीय शक्तींनी झेंडे फडकवावे आणि काश्मीर आमचा आहे म्हणावं, अशा पद्धतीने हे महाराष्ट्रात घुसलेले आहेत. या चित्रपटानंतर कश्मीरमध्ये सर्वात जास्त पंडितांवर हल्ले झालेले आहेत. जत तालुक्यात झेंडे लावायला कन्नड रक्षणला राज्य सरकारमधून छुपा पाठिंबा आहे, असा गंभीर आरोप संजय राऊतांचा गंभीर केला आहे. अशा लोकांच्या विरोधात राज द्रोहचे गुन्हे दाखल करावे.
काश्मीर फाईल या चित्रपटात एका पक्षाचा प्रचार दिसतोय व त्यामध्ये एका पक्षाची बाजू घेतलेली आहे. या चित्रपटानंतर कश्मीरमध्ये सर्वात जास्त पंडितांवर हल्ले झालेले आहेत. केंद्र सरकार ला विनंती आहे की त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर असे राजकारण करु नये, असे राऊत म्हणाले.
2018 मध्ये केलेल्या विधानावरती आता गुन्हा दाखल करत आहेत. नोटीस पाठवत आहेत. यावर देखील सरकारने भूमिका स्पष्ट करावी. हे सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर महाराष्ट्रावरचे हल्ले वाढत चाललेले आहेत, असा आरोप राऊत यांनी केलाय.