वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेच्या फायरब्रँड महिला उपनेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare Health) यांची प्रकृती ढासाळली आहे. सुषमा अंधारे यांचा रक्तदाब कमी झाल्याने प्रकृती खालावल्याची माहिती समोर येत आहे.  तसेच त्यांना चक्कर आल्याचंही म्हटलं जात आहे. दरम्यान सुषमा अंधारे या एका खासगी हॉटेलमध्ये परतल्या आहेत. (shiv sena uddhav thackeray group fire brand  leader sushma andhare health deteriorated)


नक्की काय झालं? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जळगावमधील मुक्ताईनगरमध्ये सुषमा अंधारेंची सभा नियोजित होती. ही सभा घेण्याबाबत सुषमा अंधारे या ठाम होत्या. मात्र पोलिसांनी सुषमा अंधारे यांच्या गाडीसह त्यांचा ताफा अडवला. यामुळे काही क्षणासाठी पोलीस आणि अंधारे समर्थक आमनेसामने आले. तसेच अंधारे समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. काही काळ हायव्होल्टेज ड्रामा याठिकाणी पाहायला मिळाला. त्यानंतर अंधारेंची प्रकृती ढासळली आणि त्या हॉटेलमध्ये परतल्या. 


दरम्यान नजरकैदेपेक्षा भयानक स्थिती असल्याचा आरोप अंधारे यांनी केलाय. तसंच आपण कोणत्याही कायद्याचं उल्लंघन केलेलं नसल्याचा दावाही अंधारेंनी केलाय.