रत्नागिरी : नाणार प्रकल्प रद्द करण्याची मागणी करणाऱ्या शिवसेनेवरच विरोधकांनी हल्लाबोल केलाय. खालपासून वरपर्यंत सत्ता असणाऱ्या शिवसेना हा प्रकल्प का बंद पाडत नाही, असा थेट सवाल उपस्थित करण्यात आलाय.


'प्रकल्प रद्द का होत नाही'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रत्नागिरी जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतीपासून खासदारापर्यंत शिवसेनेचीच सत्ता असताना प्रकल्प रद्द का होत नाही, असा सवाल माजी खासदार नीलेश राणे यांनी केलाय. 



 शिवसेनेचीच लोकं गुंतलेत प्रकल्पात


जमिनींच्या व्यवहारात शिवसेनेचीच लोकं गुंतल्यानं प्रकल्प रद्द करण्याची मागणी केवळ दिखावा असल्याचा आरोप नीलेश राणे यांनी केलाय.  दरम्यान, या प्रकल्पाच्या वादात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही उडी घेतली आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधक रस्त्यावर उतरण्याचे संकेत देण्यात आलेत.


दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी या प्रकल्पावरून सत्ताधाऱ्यांना इशारा दिलाय. कोकणचा विनाश करणार असाल तर खबरदार, असे सांगत विरोध केलाय.