नाशिक : Shiv Sena's Sholay style agitation : शिवसेनेच्यावतीने ओझर येथे विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाढते घाणीचे साम्राज्य, अनियमित पाणीपुरवठा आणि दिवाबत्ती या समस्यांकडे प्रशासकपदी असलेले निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. सेनेच्यावतीने पाण्याच्या टाकीवर चढून महिला आणि पुरुषांनी शोले स्टाईल आंदोलन केले. 


यावेळी जोरदार घोषणाबाजी करत समस्या मार्गी लावण्याचीही मागणी ही शिवसेनेच्यावतीने या शोले स्टाईल आंदोलनाच्यावेळी करण्यात आली. या समस्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शिवसेनेच्यावतीने प्रशासनाला देण्यात आला आहे.