रायगड : किल्‍ले रायगडावर सुरू असलेल्या उत्खननात शिवकालीन वस्‍तू आणि त्‍यांचे अवशेष सापडत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामध्‍ये शस्त्रांचे अवशेष, शिवकालीन नाणी, त्याकाळात वापरल्या जाणार्या बंदूकीतील गोळया, तोफेचे अवशेष, नक्षीदार मातीची मडकी, त्याकाळातील विटा, कौलै त्याच बरोबर तोफगोळे आणि अन्‍य काही वस्‍तूंचा समावेश आहे. किल्‍ले रायगडच्‍या संवर्धनाचे काम सध्‍या हाती घेण्‍यात आलंय . त्‍यासाठी खासदार संभाजीराजे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली प्राधिकरणाची स्‍थापनाकरण्‍यात आलीय .


पुणे येथील डेक्कन विद्यापिठात पुरातन खात्याचे शिक्षण घेणारे दहा विद्यार्थी त्यांच्या पर्यवेक्षकांसोबत गडावर दाखल झाले आहेत संपूर्ण गडाची पाहणी केल्यानंतर काही मोजकीच ठिकाणं उत्खननासाठी निवडण्यात आली या उत्खननाबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी, जगदीश्वर मंदीर आणि वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरदेखील शास्त्रीय पध्दतीने रासायनीक प्रक्रिया सुरू आहे. कोकणात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने या पुरातन वास्तुना धोका निर्माण होऊ शकतो यासाठीची खबरदारी म्हणून ही प्रक्रिया करण्यात येत आहे .