`जे हाय ते हाय जे नाय ते नाय`, शिवेंद्रराजेंची डायलॉगबाजी
यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
सातारा: साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे यांचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिवेंद्रराजे यांचा शनिवारी वाढदिवस होता. यावेळी कार्यकर्त्यांनी शिवेंद्रराजे यांना त्यांच्यावर रचलेले गाणे ऐकून दाखवले. यानंतर शिवेंद्रराजे यांनाही डायलॉग ऐकवण्याचा मोह आवरता आला नाही. कार्यकर्त्यांसमोर त्यांनी मिशा पिळत 'जे हाय ते हाय जे नाय ते नाय' हा डायलॉग बोलून दाखवला. यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. सोशल मीडियावर या प्रसंगाचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
उदयनराजे-शिवेंद्रराजेंमध्ये पुन्हा 'मिले सूर मेरा तुम्हारा'
साताऱ्याच्या राजकारणात उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांची नेहमीच चर्चा असते. या दोन्ही नेत्यांमधील संघर्षामुळे स्थानिक राजकारणात नेहमीच तणाव असतो. मात्र, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दोघांमध्ये समेट घडवून आणला होता.