शिवसैनिकासाठी शिवसेना बनली वाली, घरच्यांसाठी हा नेता होणार कैवारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकर बरे व्हावे यासाठी शिवसैनिक सुमंतजी रूईकर यांनी बीड ते तिरूपती अशी पदयात्रा करण्याचा निश्चय घेतला.
मुंबई : शिवसेनेसाठी लढण्याऱ्या आणि मदतीला धावून येणाऱ्या शिवसैनिकांची कमी नाही. प्रत्येक शिवसैनिकाचं आपल्या शिवसेनेवरती आणि ठाकरे कुटुंबावरती प्रेम आहे आण आपलं प्रेम दाखवण्यासाठी शिवसैनीक काहीही करु शकतो आणि याच गोष्टीची पुन्हा एकदा जाणीव करुन दिली ती सुमंतजी रूईकर यांनी. सुमंतजी रूईकर हे एक कट्टर शिवसैनिक होते आणि त्यांनी आपल्या लडके मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या प्रकृतीसाठी तिरुपतीपर्यंत पदयात्रा करण्याचा निश्चय केला. परंतु रस्त्यात त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
आपल्या सगळ्यांना हे माहित आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती खराब होती, ज्यासाठी ते काही काळ रुग्णालयात देखील झाले होते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकर बरे व्हावे यासाठी शिवसैनिक सुमंतजी रूईकर यांनी बीड ते तिरूपती (Beed to Tirupati) अशी पदयात्रा करण्याचा निश्चय घेतला. पण वाटेत त्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना कर्नाटकातील रायचूरमधील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळले आहे.
या घटनेनंतर या कट्टर शिवसैनिकाच्या घरच्यांचा सांभाळ करण्यासाठी शिवसैनेतील काही मंत्री पुढे सरसावले आहेत, ज्यांनी त्यांच्या कुटुंबाच्या पालकत्वाची जबाबदारी घेतली आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी सुमंतजी रूईकर यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली. तर शिवसेना सचिव आणि तिरूपती बालाजी देवस्थान संस्थेचे मानद सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी त्यांच्या कुटुंबीयांना तात्काळ 50 हजार रुपयांची आर्थिक मदत पाठवली.
या आधीही सुमंत रूईकर यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी बीड ते तिरूपती पायी वारी केली होती. त्यानंतर त्यांचा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला. त्यानंतर आता ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीसाठी बीड ते तिरूपती पायी चालत गेले. परंतु यावेळेस त्यांना मृत्यूनी गाठलं, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.