मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली दु:ख व्यक्त केलं. शिवसेनेमध्ये कोकणात वादळ होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर नाराजी नाट्य सुरू झालं आहे. रामदास कदम प्रचंड नाराज झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागच्या तीन चार महिन्यांपासून माझ्या बद्दल उलट सुलट चर्चा होत आहेत. बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो आज पर्यंत मी किरीट सोमय्या यांच्या सोबत बोललो नाही. त्यांना मी कोणतीही माहिती दिली नाही


अनिल परब रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. पालकमंत्री म्हणून त्यांचं कुठलंही काम नाही. त्यांच्या विरोधात जिल्ह्यातील नागरिकांमध्ये मोठा असंतोष आहे. असंही यावेळी रामदास कदम म्हणाले. 


रामदास कदम यांचं अनिल परब यांना आव्हान 



'माझ्या विरोधात मेळाव्यात ज्या घोषणा दिल्या गेल्या त्यांचा निषेध करतो. या सगळ्यामागे कोण हे मला माहीत आहे. अनिल परब यांनी वांद्रे इथून निवडणूक लढवून दाखवावी. नगरपंचायत, नगरसेवकपदाची निवडणूक लढवून दाखवावी असं आव्हान रामदास कदम यांनी दिलं आहे.' 


'मला राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा डाव आहे असंही यावेळी रामदास कदम सांगायला विसरले नाहीत. माझ्या मुलाला तिकीट न देण्यासाठी अनिल परब यांनी काम केलं पणउद्धव ठाकरे यांनी माझ्या मुलाला तिकीट दिलं.'


अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप


पक्षाची निष्ठा आता आम्हाला उदय सामंत यांच्याकडून शिकावी लागते. शिवसेना पक्षप्रमुख कोण आहेत उद्धव ठाकरे की अनिल परब? असा आम्हाला प्रश्न पडला आहे. अनिल परब राष्ट्रवादी नेते असल्यासारखे वागत आहेत. अनिल परब शिवसेनेचा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या घशात घालत आहेत, असा गंभीर आरोपही रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर केला आहे. 


रामदास कदम यांनी व्यक्त केलं दु:ख


अनिल परब गद्दार आहेत असंही यावेळी रामदास कदम बोलताना म्हणाले. ज्यांनी शिवसेना मोठी केली त्यांची हकालपट्टी करण्यात आली. कडवट निष्ठावान असून आम्हाला त्रास दिला जातो असं दु:ख रामदास कदम यांनी व्यक्त केलं.