चंद्रपूर : आज फ्रेंडशीप डे... राज्याच्या राजकारणात सर्वात जुन्या मैत्रीची कथा म्हणजे भाजप-सेनेची. या संबंधात मोसमी चढउतार येत असतात. सध्याही या दोन्ही पक्षांमध्ये तणावाचे वातावरण बघायला मिळतंय... मात्र चंद्रपुरात श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित स्पर्धा पुरस्कार वितरण सोहळ्याच्या मंचावर शिवसेना नेते संजय राऊत आणि अर्थमंत्री तसेच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एकमेकांचे कौतुक करत आगळा फ्रेंडशीप डे साजरा केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुनगंटीवार हे उत्तम काम करत आहेत. त्यांना व्हिजन आहे, या शब्दात राऊत यांनी मुनगंटीवार यांचं कौतूक केलं. तर आमची मैत्री एका दिवसाची नसून ती ५ वर्ष चालेल, अशी ग्वाही मुनगंटीवार यांनी दिली.