कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे : पायलटच्या प्रसंगावधानामुळे आज जवळपास ४० प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचलाय. ठाण्याचे नगरसेवक आणि पदाधिकारी असे एकूण ४० जण या विमानातून प्रवास करत होते. 'गो एअर' कंपनीचं हे विमान आहे. अभ्यास दौऱ्याच्या निमित्तानं ठाण्याचे शिवसेनेचे नगरसेवक राजधानीला निघाले होते. त्यांनी जवळपास ३० मिनिटांचा प्रवासही केला... परंतु, अचानक विमानात काहीतरी गडबड असल्याचं पायलटच्या लक्षात आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पायलटनं प्रसंगावधान राखत प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण न करता विमान पुन्हा मुंबईच्या दिशेनं फिरवलं आणि मुंबई विमानतळावर या विमानाचं इमर्जन्सी लॅन्डिंग करण्यात आलं.


विमानात तांत्रिक बिघाड जाणवल्यानं पायलटनं कंट्रोल रुमशी संपर्क साधत माघारी फिरण्याचा निर्णय घेतला होता. अपघाताच्या भीतीने प्रवासी काही काळासाठी धास्तावले होते. पण, अनर्थ टळला आणि अखेर सगळे जण सुखरुप असल्यानं सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला. त्यानंतर दुसऱ्या विमानातून नगरसेवक दिल्लीला रवाना झाले.