कोल्हापूर : महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरा देईल, अशी घटना आज कोल्हापुरात घडलीय. शिवसेनेतील नाराज आमदारांनी पक्षाच्या नेतृत्वाविरुद्ध बंड पुकारलंय. 'म्हाताऱ्या मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवा आणि तरुणांना संधी द्या' अशी मागणी करत सेनेतील नाराज आमदारांनी बंडाचा झेंडा फडकावलाय. सेनेच्या पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांत असंतोषाची ठिणगी पडलीय. पक्षात संधी मिळत नसल्याचं सांगत सेनेतील तरुण नेतृत्व पुढे येऊ पाहतंय. ज्येष्ठांच्या फळीमुळे आपली पक्षात घुसमट होत असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. 


'झी २४ तास'च्या सूत्रांच्या माहितीनुसार, 'शिवसेनेच्या मंत्री मंडळात फेरबदल करा... म्हाताऱ्या मंत्र्य़ांना  घरचा रस्ता दाखवा... तरुणांना संधी द्या... अन्यथा नागपूर अधिवेशनावर बहिष्कार टाकला जाईल' अशी तंबीच पक्षातील नाराज आमदारांनी पक्षनेतृत्वाला दिलीय. साहजिकच यामुळे उद्धव ठाकरेंच्या अडचणी चांगल्याच वाढल्याचं दिसून येतंय.