Kirit Somaiya Viral Video प्रकरणावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, `जो कर्माने मरणार त्याला...`
Sanjay Raut React On Kirit Somaiya Viral Video: किरीट सोमय्यांचा व्हिडीओ सोमवारी सायंकाळपासून व्हायरल झाल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पहिल्यांदाच या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Sanjay Raut React On Kirit Somaiya Viral Video: भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या कथित व्हायरल व्हिडीओवरून (Viral Video) राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असतानाच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. संजय राऊत यांनी ट्वीटरवरुन प्रतिक्रिया नोंदवताना सोमय्या यांचा थेट उल्लेख केलेला नाही. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदित्य ठाकरे आणि भारतीय जनता पार्टीला आपल्या ट्वीटमध्ये टॅग केलं आहे.
राऊत काय म्हणाले?
संजय राऊत यांनी, आपल्या ट्वीटमध्ये, "आमच्यावर आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आहेत. ते सांगायचे, "जो आपल्या कर्माने मरणार आहे त्याला धर्माने मारू नका." नेमके तसेच घडत आहे. यापुढे देखील बरेच काही घडणार आहे. जे जे होईल ते पाहत राहावे. जय महाराष्ट्र!" असं म्हटलं आहे. राऊत यांनी पहिल्यांदाच किरीट सोमय्या प्रकरणावर भाष्य केलं आहे. यामध्ये त्यांनी थेट उल्लेख टाळला असला तरी त्यांनी या विधानातून सोमय्यांकडेच इशारा केला आहे.
कारवाईची मागणी करणार
सोमवारी सायंकाळी किरीट सोमय्या यांचा कथित वादग्रस्त व्हायरल व्हिडिओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. हा मुद्दा आपण अधिवेशनात उचलणार असल्याचं अंबादास दानवेंनी 'झी 24 तास'ला दिलेल्या माहितीत सांगितले. किरीट सोमय्यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल होत आहे. 'ZEE 24 तास' या व्हिडिओची पुष्टी करत नाही.
किरीट सोमय्यांचे फडणवीसांना पत्र
किरीट सोमय्या यांनी राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणी पत्र लिहिलं असून आपण कोणत्याही महिलेवर अत्याचार केले नाहीत असं म्हटलं आहे. या प्रकरणाची सविस्तर चौकशी केली जावी अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. त्यांनी ट्वीटरवरुन हे पत्र शेअर केलं आहे.
अनेकांचे घोटाळे केले उघड
किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीमध्ये सत्ताधारी पक्षांमधील अनेक नेत्यांचे घोटाळे बाहेर काढले होते. किरीट सोमय्या यांच्या खळबळजनक आरोपांमुळे अनेक नेते ईडी, सीबीआयच्या च्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. आता सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांनी या व्हिडिओची चौकशी करण्याची मागणी केली असून या विषयावरुन आज विधानसभेत शक्यताही दानवे यांच्या विधानामुळे व्यक्त केली जात आहे.