मुंबई : पालघर पोटनिवडणुकीच्या प्रचारातली रंगत आणखी वाढलीय...मनसेपाठोपाठ आता शिवसेना देखील बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या विरोधात आक्रमक झाली आहे. पालघरच्या बुलेट विरोधी कृती समितीला शिवसेनेनं पाठिंबा दर्शवलाय. कृती समितीच्या शिष्टमंडळानं शुक्रवारी 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली.


येत्या ३ जूनला बुलेट ट्रेनच्या विरोधात पालघरमध्ये जनमंच आंदोलन उभारणार असून, त्यात शिवसेनाही सहभागी होणारा आहे. मनसेनं या प्रकल्पाला विरोध करताना, अधिकाऱ्यांमार्फत सुरू असलेली जमीन मोजणी बंद पाडली होती. आता मनसेपाठोपाठ शिवसेनेनंही विरोधाची भूमिका घेतल्यानं बुलेट ट्रेन हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रेंगाळण्याची भीती व्यक्त केली जातेय.