मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांबाबत शिवसेना आक्रमक...
मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांबाबत शिवसेना चांगलीच आक्रमक झालेली पहायला मिळाली.
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांबाबत शिवसेना चांगलीच आक्रमक झालेली पहायला मिळाली. शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांच्याबाबत प्रशासन कोणत्याही प्रकारे लक्ष देत नव्हतं त्यामुळे शिवसेनेने खेड येथील भऱणे नाक्यावर रास्तारोको केला. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झालेली होती.
आधी महामार्गावरचे खड्डे भरा मगच महामार्ग चौपदरीकरणाचं काम सुरू करू देवू अशी ठाम भूमिकाच शिवसेनेने घेतली आहे. महामार्गावर सध्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून प्रशासन या खड्ड्यांकडे लक्ष देत नाहीत ज्या कंपन्यांनी महामार्ग चौपदरीकरणाची काम घेतली आहेत त्याच कंपन्यांकडे रस्ते दुरूस्तीची जबाबदारी देण्यात आलेली आहे. मात्र याकडे कंपन्या जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शिवसेनेने केलाय 5 नोव्हेंबरपर्यंत महामार्गावरचे खड्डे भरा अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर देवू अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे.