Shivsena : `उलट्या काळजाचा कंपू...`, उद्धव ठाकरे यांची एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका!
उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला खोकासूरांची उपमा दिली
Uddhav Thackeray live: शिवसेनेचं निवडणूक चिन्ह असेललं ‘धनुष्यबाण’ निवडणूक आयोगाने गोठवल्यानंतर (shivsena logo news) राजकीय वर्तुळामध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालं आहे. शिवसेना आणि शिंदे गट या दोघांनी एकमेकांना यासाठी जबाबदार धरलं जात आहे. या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Facebook live) यांनी फेसबूक लाईव्ह करत शिंदे गटावर टीकास्त्र सोडलंय.
उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला खोकासूरांची उपमा दिली. शिवसैनिक आहोत म्हणून आम्ही आहोत. आता सहनशीलतेता अंत झालाय, असं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे कोण? उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी माझी ओळख आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
उलट्या काळजाचा कंपू फिरतोय, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. आईच्या काळजात कट्याळ घुसवली, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.
श्रीरामचंद्राचं धनुष्यबाण यांनी गोठवलं. 40 डोक्यांचा रावण फिरतोय, असं उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेना नावाशी तुमचा संबंध काय? असा सवाल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना विचारला आहे.
पाहा व्हिडीओ-