कोल्हापूर : आजरा तालुक्यात चौदा वर्षीय शाळकरी मुलाची गावातून नग्न धिंड काढल्याने संताप व्यक्त होत आहे. मुलीला चॉकलेट दिल्याच्या रागातून मुलाला मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी आजरा पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिरसंगी गावात एका अल्पवयीन मुलाची गावात नग्न धिंड काढण्यात आली. गावातील एका दहा वर्षांच्या मुलीला चॉकलेट दिल्याच्या रागातून या रवींद्र बुडके आणि अक्षय रवळनाथ या दोघांनी अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण केली आणि त्याची गावातून नग्न धिंड काढली.


या प्रकरणी आजरा पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून रवींद्र नारायण बुडके आणि अक्षय बुडके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.