वीजेचा तारेचा धक्का, २ जण गंभीर जखमी
नाशिकच्या सिडको परिसरात विजेच्या तारेचा धक्का लागल्यानं तीन जण जखमी झालेत.
नाशिक : नाशिकच्या सिडको परिसरात विजेच्या तारेचा धक्का लागल्यानं तीन जण जखमी झालेत. यातील दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
कमलेश सोनावणे यांचा केबल कनेक्शनचा व्यवसाय आहे. त्यांच्या कार्यालात कचरा काढत असताना एका कर्मचाऱ्याचा विद्युत तारांना धक्का लागला. त्याला वाचवण्यासाठी इतर दोघांनी प्रयत्न केला असता तेदेखील शॉक लागून जखमी झाले.
मागील महिन्यातच विद्युततारांचा शॉक लागून एकाचा मृत्यू झाला होता. घराजवळून जाणाऱ्या विद्युत तारा भूमिगत करण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जातेय. मात्र त्याकडे दुर्लक्ष केंल जात असून वीज वितरण कंपनीला जाग कधी येणार असा सवाल नागरिक व्यक्त करत आहेत.