Shocking News : पिठाच्या गिरणीत ओढणी अडकली आणि... महिलेचा धक्कादायकरित्या मृत्यू
Shocking News : नेहमी प्रमाणे सर्व सामान्य दिवस होता. मात्र, आजचा दिवस आयुष्यातील शेवटचा दिवस ठरेल याची कल्पनाही या महिलेला नव्हती. पिठाच्या गिरणीवर दळण दळण्याचा महिलेला सराव होता. मात्र, याच मशीनने महिलेचा जीव घेतला आहे. यामुळे विद्युत उपकरण वापरता खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
वैभव बाळकुंडे, झी मीडिया, लातूर : मृत्यू कुणाला कधी कुठे गाठले याचा काही नेम नाही. अशीच एक धक्कादायक घटना लातूरमध्ये (Latur) घडली आहे. पिठाच्या गिरणीत ओढणी अडकल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू आहे. महिलेचा धक्कादायकरित्या मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे (Shocking News).
लातूर शहरातील होळकरनगर मध्ये ही घटना घडली आहे. अश्विनी बालाजी ढोपरे असे मृत महिलेचे नाव आहे. घरात दणळयंत्रावर दळण दळत असताना त्यांच्या दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अश्विनी ढोपरे या एमआईटी मेडिकल कॉलेजमध्ये नर्स या पदावर काम करत होत्या. आपली ड्युटी सांभाळून त्या घरी घरगुती पिठाची गिरणी चालवत होत्या.
नेहमी प्रमाणे धान्याचे दळण दळत असताना अचानक गिरणीच्या पट्यात त्यांची ओढणी अडकली. यात त्या ओढल्या गेल्या. पट्ट्यात ओढणी अडकल्याने ओढळीचा गळ्याला फास लागला यातच अश्विनी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये आकास्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
साडीचा गळफास लागून मृत्यू
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील तडवळे येथे पोर्णिमा फाळके या ९ वर्षाच्या चिमुकलीचा झोक्यालाच मान अडकल्याने मृत्यू झाला होता. पोर्णिमा ही त्यांच्या घरामध्ये झोका खेळत होती. तिने लोखंडी पाइपला साडी बांधली होती. या साडीमध्ये बसून ती झोका खेळत होती.त्याचवेळी खेळता-खेळता अचानक तिची मान साडीमध्ये अडकून तिच्या गळ्याला फास लागला. तिने आरडाओरड केल्यानंतर हा प्रकार घरातल्यांच्या निदर्शनास आला.यानंतर घरातल्यांनी तिच्या मानेचा फास सोडवून तिला तातडीने वडूज येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.