बारामतीत धक्कादायक प्रकार उघड, जप्त केलेले ट्रक दंड न भरताच नेले
बारामतीमध्ये प्रांत कार्यालयाच्या माध्यमातून कारवाई केलेले दोन वाळूचे ट्रक बनावट पत्र आणि प्रांताधिका-यांची सही आणि शिक्का तयार करुन दंड न भरताच सोडवून नेल्याचा प्रकार उघडकीस आलाय.
पुणे : बारामतीमध्ये प्रांत कार्यालयाच्या माध्यमातून कारवाई केलेले दोन वाळूचे ट्रक बनावट पत्र आणि प्रांताधिका-यांची सही आणि शिक्का तयार करुन दंड न भरताच सोडवून नेल्याचा प्रकार उघडकीस आलाय.
या प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र या प्रकरणात महसूल खात्यातील अधिकारी आणि कर्मचारी गुंतवल्याचा संशय व्यक्त केला जातोय.
दरम्यान, यासंदर्भात माध्यमांशी बोलण्यास नकार देणाऱ्या प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी असे प्रकार जुनेच असल्याची कबुली देत जिल्ह्यात सर्वत्र असंच चालतं अशी मुक्ताफळे उधळलीयत. त्यामुळे या प्रकरणातील संशय अधिकच बळावला असून यात नेमके दोषी कोण, असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे.