नागपूर : कोरोना व्हायरसने (Corona Virus) संपूर्ण देशाला वेठीस धरलं आहे. असं असताना इंग्लंडमध्ये नव्या कोरोना व्हायरसचा (New Corona Virus) स्ट्रेन (Strain)  प्रादुर्भाव वाढत आहे. ब्रिटनमध्ये नवा कोरोना विषाणू सापडल्याने जगासमोर आव्हान उभे राहिले आहे. नवा विषाणू किती प्रभावी आहे यावर संशोधन सुरू असताना नागपूरमध्ये (New Corona Virus Suspected Found in Nagpur)  इंग्लंडहून आलेल्या तरूणाला कोरोनाची लागण झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंड प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या २८  वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे आता महाराष्ट्राचे धाबे दणाणले आहेत. दक्षिण व पूर्व इंग्लंडमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या नवीन करोना विषाणूमुळे बाधित झालेला संशयित रुग्ण नागपुरात आढळल्याने  खळबळ उडाली आहे. 


इंग्लंडमध्ये कोरोनाच्या बदलत्या स्वरूपाची अनेकांना लागण झालीय. यामुळे या तरूणाला नवा कोरोना व्हायरसची लागण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे इंग्लंड प्रवासाची पार्श्वभूमी असलेला हा तरुण नवीन कोरोना बाधित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 



नवीन कोरोना संशयित असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.  तरुणावर मेडिकलमध्ये उपचार सुरु असून पुण्यातील एनआयव्ही प्रयोगशाळेत तरूणाचे तपासणीसाठी नमुने  पाठवले आहेत. या तरुणाच्या संपर्कात आलेले कुटुंब सदस्यांसह इतर काही जणही  कोरोनाबाधित झाल्याची माहिती मिळाली आहे. 


 इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण


इंग्लंडमधील कोरोना विषाणूमध्ये झालेल्या बदलाच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षणासाठी विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणूमध्ये झालेल्या जनुकीय बदलाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण करण्यात येणार आहे. विमानतळ आरोग्य अधिकाऱ्यांकडून २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात इंग्लंडहून मुंबईत उतरलेल्या  प्रवाशांची यादी राज्याला प्राप्त झाली आहे. ही यादी प्रत्येक जिल्ह्याला आणि महानगरपालिकेला पाठविण्यात आली आहे.