Mumbai News : कल्याणमध्ये धक्कादायक घटना! वायफाय राऊटरचा ब्लास्ट झाल्याने तीन जण जखमी
Blast of WiFi router : कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वायफाय राऊटरचा ब्लास्ट झाल्याने तीन जण जखमी झाल्याने कल्याणमध्ये खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.
Mumbai News : कोरोना काळानंतर वर्क फ्रॉम होमची संकल्पना प्राईवेट कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. याच काळात वायफाय राऊटर आणि इंटरनेटचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेल्याची माहिती समोर आली होती. अशातच आता आत्ताही अनेक कंपन्यांमध्ये वर्क फ्रॉम होम दिलं जातं. अशातच तुम्हीही जर वायफाय राऊटर वापरत असाल तर आत्ताच सावध व्हा! कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वायफाय राऊटरचा ब्लास्ट झाल्याने तीन जण जखमी झाल्याने कल्याणमध्ये खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.
कल्याणमध्ये वायफाय राऊटरचा ब्लास्ट झालेल्या घटनेमध्ये तीन जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या तिघांचा खाजगी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आलं आहे. या ब्लास्टमध्ये एकाच्या तोंडाला जखमा झाल्यात तर दोघांच्या अंगाला भाजल्याचं समोर आलं आहे. प्रकरण चौकीत गेल्यानंतर पोलिसांनी यावर कारवाई करण्यास सुरूवात केलीये. केबल चालकाच्या विरोधात डोंबिवली टिळक नगर पोलीस स्टेशनं मध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती देखील आता समोर आली आहे. जखमी झालेल्या दोघांजणांना मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, तुम्ही राउटर बंद न करता रात्री झोपायला जात असाल तर ते किती धोकादायक ठरू शकतं. वायफायमधून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे होणाऱ्या रोगांपासून स्वतःचं संरक्षण करायचं असेल, तर तुम्ही वायफाय राउटरचा वापर झाल्यावर ते बंद करा.