Shocking News : दिल्ली (Delhi) आणि गाजियाबादमध्ये (Ghaziabad) पाळीव कुत्र्यांच्या (Pet Dog) हल्ल्याचे व्हिडिओ व्हायरल होत असतानाच आता महाराष्ट्रातूनही (Maharashtra) एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. पनवेलच्या एक सोसायटीतल्या लिफ्टमध्ये जर्मन शेफर्ड जातीच्या कुत्र्याने (German Shepherd Dog) एका डिलिव्हरी बॉयवर (Delivery Boy) हल्ला केला. या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होतं आहे. डिलिव्हीर बॉय जेवण घेऊन लिफ्टमधून बाहेर पडत असताना एका पाळीव कुत्र्याने अचानक त्याच्यावर हल्ला केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून पाळीव कुत्र्यांनी हल्ले केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता महाराष्ट्रात अशीच एक घटना घडली असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत असून लोकांच्या तीव्र प्रतिक्रियाही उमटत आहेत. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत एक डिलिव्हरी बॉय लिफ्टमधून बाहेर पडताना दिसत आहे. त्याचवेळी समोर जर्मन शेफर्ड कुत्रा त्याला दिसला. त्याला पाहून सुरुवातीला डिलिव्हरी बॉय दचकला. पण कुत्र्याच्या मालकाने त्याला काहीसं दूर केल्यानंतर डिलिव्हरी बॉय लिफ्टमधून बाहेर पडला. पण तितक्यात कुत्र्याने अचानक त्याच्यावर हल्ला केला, आणि त्याच्या प्रायव्हेट पार्टला चावा घेतला.


मिळालेल्या माहितीनुसार 29 ऑगस्टची ही घटना असून महाराष्ट्रातल्या पनवेल इथली आहे. डिलिव्हरी बॉयचं नाव नरेंद्र पेरियार असं असून त्याला नवी मुंबईतल्या एका खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानतंर लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत असून लोकांनी कुत्र्याच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 



लिफ्टमघ्ये चिमुरड्याला कुत्र्याचा चावा
काह दिवसांपूर्वीच दिल्लीजवळच्या गाजियाबादमधल्या राजनगर इथळ्या चार्म्स कॅसल सोसायटीतल्या लिफ्टमध्ये एका पाळिव कुत्र्याने चिमुरड्याचा चावा घेतला होता. कुत्रा चावल्यानंतर तो मुलगा अक्षरश: व्हिवळत होता पण कुत्र्याच्या मालकिनीला त्याची जराही दया आली नाही. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी कुत्र्याच्या मालकिनीवर जोरदार टीका केली. मुलाच्या कुटुंबियांनीही तक्रार केल्यानंतर कुत्र्याच्या मालकिनीला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.


गार्डनमध्ये खेळणाऱ्या मुलावर पिटबूलचा हल्ला
दोन दिवसांपूर्वीच गाझियाबादमध्ये एका गार्डनमध्ये खेळणाऱ्या मुलावर पिटबूल (PitbullD Dog) जातीच्या कुत्र्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात मुलाच्या चेहऱ्यावर तब्बल 150 टाके घालण्यात आले. लखनऊमध्ये पिटबूल कुत्र्याने आपल्याच मालकिनीवर हल्ला करत तिचा जीव घेतला होता.