पुणे : लग्नानंतर प्रत्येक नववधू आणि नवरदेवाच्या आयुष्याची नवीन सुरूवात होते. त्यावेळी सुरूवातीचे काही दिवस नववधू आणि नवरदेवांला एकमेकांना समजून घ्यायला जातात. तसेच आहे त्या परिस्थितीशी मिळतं जुळतं घ्यायला थोडा वेळ लागतो. अशा वेळी दोन्ही कुटूंबियांनी तसेच जोडप्यांनी एकमेकांना थोडा वेळ द्यावा. ज्यामुळे नातेसंबंध टिकवून ठेवण्यात मदत होते. परंतु बऱ्याचदा काही कारणांमुळे विवाहित जोडप्यांमध्ये गैरसमज निर्माण होतो, ज्याचा परिणाम बऱ्याचदा खूप वाईट होतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातुन एक अशीच घटना समोर आली आहे. ज्यामध्ये लग्न झाल्यानंतर नवविवाहित महिलेच्या नवऱ्याने तिच्यावरती संसय घेऊन तिला कौमार्य चाचणी म्हणजेच वर्जिनिटी टेस्ट करायला लावली. ते एवढ्यावरच न थांबता या महिलेला मुलं झालं आणि ती मुलगी असल्या कारणामुळे तिचा छळ करुन माहेरी पाठवण्यात आले.


ज्यानंतर या २५ वर्षिय विवाहित महिलेनं बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgardan Police Station) तक्रेर नोंदवली आहे. त्यावरुन पोलिसांना पती आकाश शिंदे (वय २६, रा. ठाणे) याच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे सगळं प्रकरण 2017 ते जानेवारी 2021 दरम्यान घडलं आहे.


पोलिसांनी सांगितले की, या महिलेच्या नवऱ्याने लग्न झाल्यापासून बऱ्याचदा तिच्या चारित्र्यावर संशय घेतला आणि कौमार्य चाचणी केली. तसेच या महिलेला मुलगी झाली म्हणून तिला मानसिक आणि शरीरीक त्रास दिला गेला. तिला घरातील सर्व कामे करायला लावून उपाशी ठेवले गेले.


या महिलेचा पती आकाश हा दारु पिऊन शिवीगाळ करुन तिला मारहाण करत असे. तसेच तिला जानेवारीमध्ये माहेरी पाठवून दिले. त्यानंतर महिलेला घरी नवऱ्याने घेतलेच नाही. ही महिला जबरदस्ती जेव्हा तिच्या नवऱ्याच्या घरी गेली तेव्हा तिने पाहिले की, तिच्या नवऱ्याने आपले घर बदलले आहे. तसेच त्याच्या घरच्यांनी तिचे फोन घेण्यासाठी देखील टाळाटाळ केली. ज्यामुळे शेवटी या महिलेला पोलिसांकडे धाव घेण्याशिवाय काहीही पर्याय उरला नाही.


ज्यानंतर या महिलेनं मानसिक आणि शारिरीक छळाची तक्रार पोलिसात दिली. सहायक पोलीस निरीक्षक आता या घटनेचा पुढील तपास करत आहेत.