Shocking News : आताची धक्कादायक बातमी समोर येतेय, मध्यरेल्वेच्या (Central Railway) आंबिवली रेल्वे स्थानकावर (Ambivli Railway Station) एका प्रवाशाने (Passenger) तिकीट तपासणीसावर (TC) जीवघेणा हल्ला केला आहे. प्रवाशाने टीसीच्या मानेवर हल्ला केल्याने या हल्ल्यात टीसी गंभीर जखमी झाला. रेल्वे स्थानकात तिकिट तपासात असताना प्रवाशाने हा हल्ला केला. टीसीने या प्रवाशाला तिकिट दाखवायला सांगतायच प्रवाशाने टीसीच्या मानेवर ब्लेडने वार केला. अचानक घडलेल्या घटनेने रेल्वे स्थानकावर गोंधळ निर्माण झाला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकी घटना काय?
सुनील गुप्ता असं जखमी झालेल्या टीसीचे नाव आहे.  सकाळी नऊच्या सुमारास आंबिवली स्थानकातील प्लॅटफॉर्म नंबर दोनवर तर तिकीट तपासत होते.यावेळी एका प्रवाशाला त्यांनी तिकीट दाखवायला सांगितले. त्यावेळी प्रवाशांने खिशातले ब्लेड काढत त्यांच्या मानेवर वार करीत प्राण घातक हल्ला  केला.या हल्ल्यात जखमी झालेल्या गुप्ता यांना तात्काळ रेल्वेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आलेत. 


आंबिवली स्थानकातील सीसीटीव्ही (CCTV) बंद असल्याची माहिती कल्याण कर्जत कसारा रेल्वे संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी दिलीय.शिवाय रेल्वे पोलिसांचं अशा प्रकारे गुन्हेगारी स्वरूपाचे लोक फिरत असताना दुर्लक्ष होत असल्याचा आरोप देखील प्रवासी संघटने कडून केला जातोय.तर आरोपी चा रेल्वे पोलीस शोध घेत आहें.


प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर
भरदिवसा गर्दीच्या वेळी रेल्वे स्थानकात टीसीवर झालेल्या हल्ल्याने रेल्वे स्थानकातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही अशा अनेक घटनांना समोरं जावं लागतं. रेल्वेमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात, रेल्वे स्थानकांवरही प्रवाशांची गर्दी असते. पण सुरक्षिततेबाबत पाहिलं तर प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावरच आहे. मध्य रेल्वे मार्गावर ठाणे रेल्वे स्थानकाच्या पुढील स्थानकं सुरक्षेच्या दृष्टीने अजूनही धोकादायक आहेत. 


गुन्हेगारांवर वचक नाही
रेल्वे स्थानकांवर पोलिसांचा पहारा असतानाही अनेकवेळा मोबाईल, किंमती ऐवज रेल्वे स्थानक आणि रेल्वेतून चोरटे लंपास करत असल्याच्या घटना घडल्या आहेत. चोरीसाठी चोरटे कोणत्याही थराला जातात. काही महिन्यांपूर्वी कळवा रेल्वे स्थानकात मोबाईल खेचून पळणाऱ्या चोराबरोबर झालेल्या झटापटीत विद्या पाटील या महिलेचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली, पण मुळात अशा घटनांना आळा घालण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज आहे.


चोरट्यांना झोपड्यांचा आधार
अनेक रेल्वे स्थानकांच्या आजूबाजूला झोपडपट्टीचा विळखा आहे. चोरटे चोरी केल्यानंतर स्थानकालगत असलेल्या झोपड्यांमध्ये पळून जातात. त्यामुळे चोरट्यांना शोधणं हे पोलिसांसमोर आव्हान असतं.