चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, उल्हासनगर : वाहतूक विभागातील वाहनांना टोइंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या घाईगडबडीत आणि नियम डावलून काम करण्याच्या पद्धतीने आज एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. उल्हासनगरमध्ये हा धक्कायक प्रकार घडला आहे. जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उल्हासनगर कॅम्प नंबर 3 च्या 17 सेक्शन भागात रस्त्याच्या कडेला उभी असलेली दुचाकी कोणतीही अनाउन्समेंट न करता टोईंग गाडी वरील कर्मचारी घाईगडबडीत उचलत होते. आपली दुचाकी उचलली जात आहे म्हणून ती पुन्हा मिळवण्यासाठी जाणाऱ्या तरुणाचा अपघात झाला. अपघात  त्याचं डोकं फुटलं आणि गंभीर जखमी झाला.यात वाहतूक पोलिसांनी चूक असल्याने नागरिकांनी वाहतूक पोलिसाला घेरून आपला रोष व्यक्त केला.


दरम्यान सध्या त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे.दरम्यान वाहतूक विभागाच्या चुकीमुळे अनेकदा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. वाहने टो करणारे कर्मचारी वाहने उचलण्याच्या नादात दादागिरी करतात त्याला वाहतूक पोलीस सहकार्य करतात असा नागरिक आरोप करतात. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरीकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.


ट्रक आणि बसची समोरासमोर धडक


हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ शहरापासून काही अंतरावर असलेल्या वगारवाडीजवळ वसमत औंढा बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. यात बसमधील 30 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती सोमर आली होती.  या अपघातात बसचा चालक हा गंभीर जखमी झाला असून सर्व जखमींना औंढा नागनाथ रुग्णालयात दाखल करण्यात आले.  अपघात एवढा भीषण होता की बस ही रोडवर आडवी झाली. त्यामुळे रोडच्या दोन्ही साईडला वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या,


दुचाकी चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश


जळगाव पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या टोळीचा पर्दाफाश केला असून दुचाकी चोरी करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना जळगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेल्या दोन अल्पवयीन मुलांकडून चोरी केलेल्या सहा दुचाकी देखील पोलिसांनी जप्त केल्या असून पालकांकडून दुचाकी चालवायला मिळत नसल्याने अल्पवयीन मुलांनी दुचाकी चोरीचा मार्ग पत्करल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आला आहे. तर चोरीच्या दुचाकी विक्री करून पैसे कमवण्याचे साधन म्हणून देखील या अल्पवयीन मुलांनी विविध ठिकाणावरून दुचाकी चोरी केल्या असून याप्रकरणी पोलिसांकडून अल्पवयीन मुलांची अधिक चौकशी केली जात आहे.