सांगली : सांगलीतल्या मिरज तालुक्यातल्या म्हैसाळ इथं एकाच कुटुंबातील 9 जणांनी आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. पण आता य घटनेला धक्कादायक वळण लागलं आहे. या आत्महत्या नसून हत्या असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेवणात विषारी पदार्थ मिसळून या नऊ जणांची हत्या करण्यात आल्याचं निष्पन्न झालं आहे. या प्रकरणी दोन संशयीतांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असून यामागे नेमकं कारण शोधण्याचं काम पोलीस करत आहेत. अब्बास महंद बागवान आणि धीर चंद्रकांत सरवशे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं आहे. सांगलीचे पोलीस अधीक्षक दीश्रित गेडाम यांनी ही माहिती दिली आहे. 
 
मृतांमध्ये पोपट यल्लाप्पा वनमोरे (वय 52), संगीता पोपट वनमोरे (वय 48), अर्चना पोपट वनमोरे ( वय 30), शुभम पोपट वनमोरे (वय 28), माणिक यल्लाप्पा वनमोरे (वय 49), रेखा माणिक वनमोरे (वय 45), आदित्य माणिक वन (वय 15) अनिता माणिक वनमोरे (वय 28) आणि अक्काताई वनमोरे (वय 72) या नऊ जणांचा समावेश आहे. 


म्हैसाळ इथल्या नरवाड रोड जवळ असलेल्या अंबिका नगर चौक आलगत मळ्यात डॉक्टर वनमोरे कुटुंबासह राहात होते. अंबिकानगरमध्येच या कुटुंबाचे एक तर राजधानी कॉर्नर इथं दुसरं घर आहे. यापैकी एका घरात सहा मृतदेह आढळून आले होते. तर दुसऱ्या घरात तिघांचे मृतदेह मिळून आले.