Chandu Champion : चंदू चॅम्पियन सिनेमा हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजत आहे.   चंदू चॅम्पियन सिनेमात अभिनेता कार्तिक आर्यनने पॅरालिंपिक गोल्ड मेडालिस्ट मुरलीकांत पेटकर यांची भूमिका साकारली आहे.  'चंदू चॅम्पियन' हा सिनेमा विद्यार्थ्यांना मोफत दाखवावा अशी मागणी करण्यात आली आहे.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अतुलनीय जिद्द आणि चिकाटीचे मूर्तिमंत उदाहरण असलेले माजी सैन्यअधिकारी आणि पॅरा ऑलिम्पिकमध्ये देशाला पहिले वहिले सुवर्णपदक मिळवून देणारे मुरलीकांतजी पेटकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या  वर्षा या निवासस्थानी येऊन सदिच्छा भेट घेतली. 


यावेळी त्यांनी त्यांच्या जीवनावर आधारित असलेल्या 'चंदू चॅम्पियन' या सिनेमाचे खेळ शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयात तरुणांसाठी विनामूल्य आयोजित करावेत अशी विनंती मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. यावेळी त्यांच्या या विनंतीचा शासन नक्की विचार करेल आणि त्यानुसार योग्य तो निर्णय घेईल असे त्यांना सांगितले. 


मुरलिकांत पेटकर यांचे संघर्षमय जीवन आणि कोणत्याही परिस्थितीत हार न मानण्याची वृत्ती ही आजच्या तरुणाईसाठी प्रेरणादायक आहे. त्यांच्या जीवनकथेतील हेच मूल्य शोधून दिग्दर्शक कबीर खान यांनी अभिनेता कार्तिक आर्यनला घेऊन त्यांच्या आयुष्यावर आधारित 'चंदू चॅम्पियन' हा सिनेमा बनवला असून त्याने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. राज्यात हा सिनेमा यापूर्वीच टॅक्स फ्री करण्यात आला आहे. मात्र तरीही तो सर्वच लहान मुलांना आणि तरुणांना पाहता यावा यासाठी या सिनेमाचे विशेष खेळ आयोजित करावेत अशी मागणी पेटकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदनाद्वारे केली आहे.  यावेळी यांच्यासह त्यांचा मुलगा अर्जुन आणि त्याचे सर्व सहकारी आवर्जून उपस्थित होते.