वर्धा : वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव येथे मध्यरात्री दोन अज्ञात चोरट्यानी चाकूचा धाक दाखवत जबरी चोरी केली आहे. या घटनेत चोरट्यांनी ६ लाख ५० हजाराचा ऐवज लंपास केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत तपासाला सुरवात केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मांडगाव येथील महादेव पिसे हे मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास शौचलयास गेले असता घराबाहेर बसलेल्या दोन चोरट्यानं घरात प्रवेश केला. या दरम्यान महादेव पिसे यांना चाकूचा धाक दाखवत घरातील कपाटाच्या चाव्या हिसकावल्या. कपाटातील ४ लाख  ५० हजार नगदी आणि २ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. या घटनेच्या वेळी घरात महादेव पिसे, त्यांचा मुलगा, सून आणि महादेव यांची पत्नी हजर होती.


घटनेची माहिती  मिळताच उपविभागिय पोलीस अधिकारी भिमराव टेळे यांच्यासह पोलिसांचा ताफा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.