Shraddha Murder Case: श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी चार्जशीटमधून (Shraddha Walkar Murder Chargesheet) अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. हत्या केल्यानंतर आफताबने (Aftab Poonawala) अत्यंत निर्घृणपणे मृतदेहाचे तुकडे केले होते. दरम्यान चार्जशीटमधून एक नाव खुलासा झाला असून, त्यानुसार आफताबने हत्येनंतर चार ते पाच महिन्यांनी श्रद्धाचा चेहरा खराब करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर त्याची विल्हेवाट लावली होती. 


ब्लो टॉर्चच्या सहाय्याने चेहरा खराब करण्याचा प्रयत्न


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चार्जशीटमध्ये उल्लेख केल्यानुसार, हत्येनंतर चार ते पाच महिन्यांनी आफताबने श्रद्धाचा चेहरा आणि डोक्यावरील केस जाळण्याचा प्रयत्न केला होता. श्रद्धाची ओळख पटू नये यासाठी आफताबने चेहरा जाळला होता. यानंतर त्याने श्रद्धाचं मुंडकं जंगलात फेकून देत विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता.


दरम्यान त्याआधी मृतदेहाचे तुकडे करताना आफताबने श्रद्घाचं मुंडकंही कापून वेगळं केलं होतं. हे मुंडकं कापून त्याने फ्रीजमध्ये ठेवलं होतं. दरम्यान त्याची विल्हेवाट लावताना मृतदेहाची ओळख पटू नये याचीही त्याने काळजी घेतली होती. 


आफताबच्या फोनमध्ये श्रद्धाचं Instagram Account


चार्जशीटमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, हत्येनंतर आफताबने आपल्या मोबाइलमध्ये श्रद्धाचं Instagram Account लॉग इन केलं होतं. त्याने आपण श्रद्धा असल्याचं भासवत तिचा मित्र लक्ष्मण नाडर याला इन्स्टाग्रामला उत्तर दिलं होतं असंही कबूल केलं आहे. 


हत्येचं कारण काय?


आफताबने श्रद्धाची हत्या करण्याचं कारणही उघड झालं आहे. यानुसार, श्रद्धाचा एक नवा मित्र होता, ज्याला भेटण्यासाठी ती 17 मे 2022 रोजी गुरुग्रामला गेली होती. मित्राला भेटण्यासाठी ती सकाळीच घरुन निघाली होती. श्रद्धाची आफताबशी ज्या अॅपच्या माध्यमातून भेट झाली होती, त्याच अॅपवरुन हा नवा मित्र तिला भेटला होता. त्या रात्री श्रद्धा घऱी परतली नव्हती.
 
श्रद्धा दुसऱ्या दिवशी घऱी परतल्यानंतर आफताबने तिला जाब विचारला होता. यावेळी त्याने श्रद्धाला मारहाण केली होती. त्याच संध्याकाळी आफताबने श्रद्धाची हत्या केली होती. 


75 दिवसांत चार्जशीट दाखल


दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी 75 दिवसांच्या आत चार्जशीट दाखल केली. पोलिसांनी आफताबची नार्को टेस्टही केली होती. त्याआधी पॉलिग्राफी चाचणी करण्यात आली होती. यावेळी त्याला अनेक प्रश्न विचारण्यात आले. यानंतरच चार्जशीट दाखल कऱण्यात आली. 


हाडांची राख करुन रस्त्यावर फेकली


आफताबने मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर हाडांना चुरा करुन रस्त्यावर फेकून दिलं होतं. यासाठी त्याने मार्बल ग्राइंडरचा वापर केला. स्वत: आफताबने याचा खुलासा केला असून चार्जशीटमध्ये याचा उल्लेख आहे. 


चार्जशीटमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, आफताबने दिल्लीच्या छतरपूर येथील 652 नंबरच्या दुकानातून एका हातोडा, ब्लेड खरेदी केलं. यानंतर त्याने घरी आल्यानंतर हात कापून एका प्लास्टिक पिशवीत ठेवला होता.