Sick Monkey Life Save: मुंबईसह महाराष्ट्रात पावसाच्या धारा कोसळू लागल्या असल्या तरी देशाची राजधानी दिल्लीत सूर्यदेव आग ओकत आहेत. येथील उष्णतेने विक्रमी पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नागरिकांवर याचा खूप मोठा परिणाम पाहायला मिळतोय. उष्ण वारे आणि उष्णतेच्या लाटेमुळे वातावरण बिघडत आहे. उष्माघातामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याचा परिणाम मनुष्यच नव्हे तर इतर प्राणीमांत्रावरही पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी दिल्लीच्या काही भागात कमाल तापमान 48 अंशांच्या आसपास पोहोचले. या कडक उन्हामुळे माणसेच नव्हे तर प्राणीही आजारी पडत असल्याचे दिसून येत आहे. काल एका माकडाला या उन्हाचा तडाखा बसला. त्याला उष्माघाताचा त्रास सुरु झाला. त्याचा जीव वाचणे केवळ अशक्यच दिसत होते. त्याच्या जगण्याची आशा सोडण्यात आली होती. पण पुढे असं काही घडलं की त्याचा जीव वाचला. 


समोर आलेल्या माहितीनुसार, प्राण्यांसाठी काम करणाऱ्या एनजीओला पंतप्रधान कार्यालयातून फोन आला. माकडाला उष्माघात झाल्याची माहिती कॉलवर देण्यात आली. यानंतर संस्थेने आपली टीम पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानी पाठवली.  यानंतर टीमने माकडाला तात्काळ वाइल्डलाइफ एसओएसच्या उपचारकेंद्रामध्ये नेते. तेथे पशु चिकित्सकांनी माकडाची स्थिती पाहिली आणि त्यावर इलाज केला. येथे त्याचा जीव वाचला. माकड पूर्णपणे बरे होईपर्यंत त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. 


कशी दिसत होती लक्षणे?


उष्माघात आणि शरीराचे वाढलेले तापमान यामुळे माकड सुस्त आणि आजारी दिसत होते. त्याला चालता येत नव्हते. त्या माकडाचा श्वास जड होत होता. अनेक स्थानिकांच्या हे निदर्शनास आले. यानंतर त्याला एनजीओच्या आपत्कालीन हेल्पलाइनवर कॉल करण्यात आला.माकडाच्या उपचारासाठी रॅपिड रिस्पॉन्स युनिट पंतप्रधानांच्या निवासस्थानी पाठवण्यात आले 


दिल्लीकरांना उष्णतेपासून दिलासा नाहीच 


राजधानीत पुन्हा एकदा उष्णतेची लाट वाढताना दिसत आहे. येत्या काही दिवसांत दिल्ली आणखी तापणार आहे. 18 जूनपूर्वी उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळण्याची शक्यता दिसत नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. बुधवारी दिल्लीचे कमाल तापमान 44.7 अंश होते. हे प्रमाण सामान्यपेक्षा पाच अंश अधिक आहे. किमान तापमान 28.5 अंश होते. ते सामान्यपेक्षा एक अंश अधिक होते. तसेच  हवेतील आर्द्रतेचे प्रमाण 18 ते 58 टक्के होते. 


तापमान 45 अंशांपेक्षा जास्त 


दिल्ली एनसीआरमध्ये 11 ठिकाणी तापमान 45 अंशांपेक्षा जास्त होते. पालममध्ये 45.5 अंश, लोधी रोडमध्ये 45.1 अंश, रिजमध्ये 46.4 अंश, अया नगरमध्ये 45.9 अंश, फरिदाबादमध्ये 46.4 अंश, जाफरपूरमध्ये 46.3 अंश, नजफगढमध्ये 47.7 अंश, नालारेमध्ये 47.5 अंश, नालेदामध्ये 47.5 अंश, कमाल तापमान होते. पीतमपुरा उत्तर प्रदेशात ४६.७ अंश आणि पुसा येथे ४६.५ अंश होते.