कल्याण : कल्याणमधील सांगोडे कोंढेरी ग्रामपंचायतीत शिवसेना-भाजपला समान मते पडली आहेत. त्यामुळे चिठ्ठी टाकून निर्णय घेण्यात आला. आज लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी समान मते मिळाल्याने चिठ्ठ्या टाकून निवड करण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्याण तालुक्यातील सांगोडे कोंढेरी ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात आज चांगलीच चूरस पाहायला मिळाली. शिवसेना भाजप उमेदवाराना समान मते मिळाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. मात्र अखेर चिठ्ठी टाकून घेण्यात आलेल्या प्रक्रियेत शिवसेनेच्या उमेदवाराच्या गळ्यात विजयाची माळ पडली.


9 जागांसाठी निवडणूक झाली. यामधील 3 क मधील प्रतिस्पर्धी शिवसेना-भाजप उमेदवारांना समान मते पडल्याचे मतमोजणीमध्ये समोर आले. यामधील शिवसेना उमेदवार भरत केणे आणि भाजप उमेदवार कल्पेश पाटील या दोघांनाही 184 मते पडली होती. यावेळी निवडणूक यंत्रणेकडून चिठ्ठी उडवून निर्णय घेण्याचे ठरवण्यात आले. ज्यामध्ये शिवसेना उमेदवार जयेश केणे यांचा विजय झाला.


पुण्यातील भोर ग्रामपंचायतीच्या मतमोजणीत ही तीन गावातील उमेदवारांना समान मते पडल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे चिठ्ठ्या टाकून विजयी उमेदवार घोषित करण्यात आले.