नाशिक : नाशिकच्या गडकरी चौकात आज पहाटे 5.30 वाजता स्विफ्ट डिझायर आणि स्कोडा सुपर्ब कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात मायलेकीसह 3 जण जागीच ठार झालेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिन्नरला जाणाऱ्या स्कोडा कारची गडकरी चौकात स्विफ्टला जोरदार धडक बसली. या अपघातात स्विफ्ट गाडीतल्या योगिनी भामरे, सरिता भामरे, रेखाताई भामरे ठार झाल्या. वडील लीलाधर भामरे आणि ड्रायव्हर गंभीर जखमी झालाय. 


अपघात होताच स्कोडाचालक फरार झाला. त्याच्यावर मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.


एअर बॅगमुळे स्कोडाचालकाचा जीव वाचला. मृतांमधल्या योगिनी भामरे यांची लग्नासाठी पत्रिका दाखवण्यासाठी भामरे कुटुंबिय सिन्नरला चालले होते. या धक्कादायक घटनेने नाशिकमध्ये हळहळ व्यक्त होतेय.