सांगलीत सापाची तस्करी, दोघांना अटक
सापाची तस्करी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी एक साप आपल्या ताब्यात घेतलाय. या सापाची किंमत लाखोंच्या घरात आहे.
सांगली : सापाची तस्करी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी एक साप आपल्या ताब्यात घेतलाय. या सापाची किंमत लाखोंच्या घरात आहे.
सांगली जिल्ह्यात मांडूळ सापाची तस्करी करणारी टोळी सक्रीय असल्याची चर्चा सुरु होती. मात्र, ठोस कारवाई होत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत होती. दरम्यान, पोलिसांनी सापाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक केली.
मिरज तालुक्यातील खंडेराजुरी याठिकाणी गुरुवारी रात्री मांडुळाची तस्करी करणाऱ्या दोघांना डीवायएसपी धीरज पाटील यांच्या पथकाने केली अटक. यावेळी त्यांच्याकडून एक मांडूळ जातीचा साप ताब्यात घेतला. या मांडूळाची किंमत ४७ लाख रुपये आहे.