पुणे : पुण्यातील एका अवलियानं आपली ४० लाखांना विकत घेतलेली नवी कोरी पॉश गाडी चक्क कचरा उचलण्यासाठी वापरलीय... कंपनीकडून योग्य सर्व्हिस न मिळाल्यानं वैतागलेल्या एका ग्राहकानं आपला राग व्यक्त करण्यासाठी या मार्गाचा वापर केलाय. ही गटना पिंपरी चिंचवड भागात घडलीय. टोयोटा फॉर्च्युनर ही तब्बल ४० लाखांची गाडी विकत घेतल्यानंतरही कंपनीकडून योग्य ती सर्व्हिस मिळाली नाही. त्यामुळे हेमरजा चौधरी यांनी आपला राग असा व्यक्त केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निगडी परिसरात राहणाऱ्या हेमराज चौधरी यांनी १८ मार्च रोजी टोयोटा फॉर्च्युनर ऑटोमॅटिक कार ४० लाख रुपयांना खरेदी केली होती. गाडी खरेदी केल्यानंतर नंबर प्लेटसाठीही त्यांनी हजारो रुपये खर्च केले. परंतु, सुरुवातीपासूनच हेमराज यांना नव्या कोऱ्या गाडीनं हैराण करून टाकलं... गाडीमध्ये अनेक तांत्रिक समस्या दिसून येत होत्या. त्यामुळे हेमराज कंपनीवर चांगलेच निराश झाले होते. 


त्यातच ते जेव्हा पहिल्या सर्व्हिसिंगसाठी गाडी घेऊन गेले तेव्हा त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. दुसऱ्यांना अनेक चक्करा मारल्यानंतर कंपनीनं गाडीची सर्व्हिसिंग केली... परंतु, काही दिवसांतच गाडीत पुन्हा समस्या दिसून येऊ लागल्या. गाडीचं इंजिन गरम होणं, एअर कुलरमध्ये समस्या, स्टेअरिंगचं कलर निघणं, गाडी सर्व्हिसिंगसाठी चक्करा मारव्या लागणं या गोष्टींनी हेमराज त्रस्त झाले होते.


त्यामुळे नाराज झालेल्या हेमराज यांनी आपल्या महागड्या गाडीत कचरा भरून गाडीला शोरुममध्ये धाडलं. एवढे पैसे खर्च केल्यानंतर कंपनीकडून सर्व्हिस मिळत नसेल तर या गाड्यांचा काय उपयोग? त्यामुळे ही गाडी आपण मुंबई महापालिकेला कचरा उचलण्यासाठी देणार आहे, असं हेमराज यांनी म्हटलंय.