त्या मुलुंडच्या दलालाला, भXव्याला... संजय राऊत यांनी सोमैय्यांना दिलं हे खुलं आव्हान
खरं तर आजची पत्रकार परिषद ईडीच्या कार्यालयासमोर घ्यायची योजना होती. पण, नंतर आमची चर्चा झाली की सुरुवात इथून करु आणि अंत तिकडे करु
मुंबई : किरीट सोमैया यानं ठाकरे कुटुंबियांवर अलिबाग जवळच्या कोरलाई गावात १९ बंगले बांधलेत. ही बेनामी प्रॉपर्टी आहे, असा आरोप केलाय. त्यांना खासदार संजय राऊत यांनी खुलं आव्हान दिलंय.
आपण चार बसेस करु. त्या एकोणीस बंगल्यांमध्ये सर्व पत्रकारांची पिकनिक काढू. जर ते बंगले दिसले, तर मी राजकारण सोडेन आणि जर ते दिसले नाहीत तर त्या दलालाला जोड्याने मारेन, अख्खी शिवसेना जोड्याने मारले, असा इशारा त्यांनी दिला. त्या मुलुंडच्या दलालाला, भXव्याला माझं आव्हान आहे., असं ते म्हणाले.
आजची पत्रकार परिषद खरं तर ईडी कार्यालयासमोर घ्यायची योजना होती. पण, आमची चर्चा झाली की सुरुवात इथून आणि अंत तिकडे करु. पाहू महाराष्ट्रात कोण राहतंय, तुम्ही राहताय की आम्ही राहतोय, हा महाराष्ट्र आमच्या बापाचा आहे.
बाहेरची लोकं येऊन आमच्यावर दादागिरी करणार, आमच्या घरात घुसणार. आमच्या बायका मुलींकडे बघणार आणि भाजपवाले टाळ्या वाजणार, हा निर्लज्जपणाचा कळस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात, बाळासाहेब ठाकरे यांच्या राज्यात असं कधी घडलं नव्हतं. या राज्यात अनेकांनी राज्य केलं आहे. पण या पद्धतीने असं राजकारण कधी झालं नव्हतं, असही ते म्हणाले.