Aadhar Card Misuse:  लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी महत्त्वाचा पुरावा असलेले आधारकार्ड पैसे देऊन बनावट बनवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही गोष्ट प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्याने चक्का देशाचे सरन्यायाीश धनंजय चंद्रचूड यांच्या नावानेच स्वतःचे आधारकार्ड बनवून घेतलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाव आणी पत्ता दुसऱ्याचा मात्र फोटो स्वतःचा अशाप्रकारे सेतूचालक बनावट आधारकार्ड बनवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते सुनिल मुथ्था यांनी स्वतःचा फोटो असलेले मात्र सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे नाव आणि पत्ता असलेले एक आधारकार्ड बनवून घेतले आहे. केवळ प्रशासनाच्या हि गोष्ट लक्षात यावी यासाठी त्यांनी हे आधारकार्ड बनवले आहे. लोकसभेला आधारकार्ड दाखवल्यानंतर मतदान करता येणार आहे त्यामुळे कुणाच्याही नावे अशाप्रकारे कार्ड बनवून मतदान केलं जावू शकतं. त्यामुळं आधारकार्डचा गैरवापर टाळण्यासाठी प्रशासनाने या गोष्टीकडे गंभीरपणे बघावं आणि निवडणूक आयोगाने मतदानकेंद्रात आधारकार्ड खरे कि खोटे हे तपासण्याची यंत्रणा निर्माण करावी अशी मागणी सुनील मुथ्था यांनी केली आहे.


आधारकार्ड हा ओळखपत्राचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. त्यामुळं आधारकार्डचा गैरवापर करण्यात येतो. अशाप्रकारे बोगस आधारकार्ड दाखवून मतदान करणारे असतील तर निवडणुकीत कितीतरी बोगस मतदान होईल. त्यामुळं पारदर्शी निवडणुका या संकल्पनेलाच धक्का बसेल. हा गैरप्रकार उघडकीस आणण्यासाठी मी एका एजंटतर्फे स्वतःच्याच नावाने एक बोगस आधारकार्ड तयार केले. जेणेकरुन हे प्रशासनाच्या समोर येईल, असं सुनील मुथ्था यांनी म्हटलं आहे. 


मी एका एंजटला हाताशी घेऊन सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या नावाचं कार्ड बनवले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ते मला बनवून मिळाले. याचाच अर्थ ते कोणाच्याही नावाने आधार कार्ड बनवून देऊ शकतात आणि याच्या आधारे मतदान होऊ शकते. आता हेच कार्ड मी दाखवले तर मतदान केंद्रावर गेल्यावर याची पडताळणी करण्यासाठी काहीच साधने उपलब्ध नाहीयेत.याचाच अर्थ मी मतदान करुन निघून जाऊ शकतो. म्हणजेच निवडणुकीत बोगस मतदान होऊ शकते आणि काही विशिष्ट्य वर्गाची लोक याचा फायदा घेऊ शकतात. त्यामुळं मतदानाचा टक्कादेखील वाढणार आहे, अशी भिती सुनील मुथ्था यांनी व्यक्त केली आहे.


जे सेतू केंद्रवाले असे आधार कार्ड बनवून देत आहेत. त्यांच्यावर नियंत्रणच नाहीये. कारण ते खासगी कंपन्यांकडे देण्यात आलेले आहे. हा सगळा भोंगळ कारभार चालला आहे. हे सगळे प्रकार होऊ नये, पारदर्शी निवडणुका होणार नाहीत. काही लोक याचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. म्हणून मी ठरवले की हा प्रकार उघडकीस आणायचा. अशा प्रकारे जे आधार कार्ड बनवत आहेत. तसंच, बोगस आधारकार्डच्या सहाय्याने कोणी मतदान करत असेल तर मतदानकेंद्रावरती आधार कार्डच्या पडताळणीची यंत्रणा असावी, अशी मागणी सामाजित कार्यकर्ते सुनील मुथ्था यांनी केली आहे.