झी 24 तास, अनिरुद्ध दवाळे, अमरावती : अमरावती जिल्ह्यातील आमदार आणि खासदार हे पती पत्नी असल्याचे सर्वांना माहीत आहे. खासदार नवनीत राणा तर आमदार रवी राणा हे जोडपं अवघ्या महाराष्ट्राला ओळखीची आहे. आता अशातच अमरावती जिल्ह्यातील आणखी एक जोडीचा यात समावेश झाला आहे. कांडली ग्रामपंचायतचे सरपंच महिला सविता दशरथ आहाके आणि उपसरपंच दिलीप नेमीचंद धंडारे हेच शिवजयंती निमित्ताने विवाह बंधनात अडकले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील एक वर्षापासून सविता  आणि ते दिलीप कांडली ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच म्हणून एकत्रित काम करत आहेत. त्यात आला त्यांच्या या लग्नानंतर कांडली ग्रामपंचायतीवर पती-पत्नीची एक हाती सत्ता गावकऱ्यांसह तालुक्याला पाहायला मिळणार आहे. या अनोख्या विवाहाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे सोबतच हितचिंतकांकडून शुभेच्छाचा वर्षाव केला जात आहे.



मागील वर्षी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत दोघेही निवडून आले होते, विशेष म्हणजे त्यांनी यावेळी स्वतःचे पॅनल उभे केले होते. त्यात ते शंभर टक्के यशस्वी सुद्धा झाले.



सर्वात महत्त्वाचे म्हणजे कांडलीच्या मतदारांनी त्यांच्यावर विश्वास टाकत त्यांच्या पॅनलच्या सर्वाधिक उमेदवार निवडून दिले त्यामुळे सविता आहाके सरपंच तर उपसरपंच गंगा धंडारे हे विराजमान झाले दोघेही आपापल्या पदाची जबाबदारी यशस्वी पार पाडत असतांना शिव जयंतीच्या शुभ मुहूर्तावर लग्नाच्या बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.