अभिषेक अदेप्पा, झी मीडिया, सोलापूर : तिरुपती बालाजीच्या (Tirupati Balaji) दर्शनाहून परतणाऱ्या महाराष्ट्रातील तरुणांच्या कारला भीषण अपघात (Car Accident) झाला. या अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर चार तरुण गंभीर जखमी झाले. तिरुपती जिल्ह्यातील चंद्रगिरी मंडळ इथं हा भीषण अपघात झाला. तिरुपती बालाजीचं दर्शन घेऊन परतत असताना कार डिव्हायडरला धडकून अपघात झाला. अपघातात मयत आणि गंभीर जखमी असलेले सर्व तरुण हे जुळे सोलापुरातील (Solapur) रहिवासी आहेत. जखमींना तिरुपती इथल्या तिरुपती रुईया रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोलापुरातून नऊ तरुण तिरूपती बालाजीच्या दर्शनासाठी तवेरा गाडी मध्ये गेले होते.  दर्शन करून परतताना त्यांच्या कारला मोठा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. डिव्हायडरला धडकून अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. 


अपघातातील जखमींना तिरुपती येथील तिरुपती रुईया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातातील जखमी तरुण जुळे सोलापूर भागातील आहेत. या अपघातमध्ये मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेची दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून याबाबत चंद्रगिरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.