अफगाणिस्तान-दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे रद्द झाल्यास फायनल कोण खेळणार? जाणून घ्या नियम

टी-20 वर्ल्डकपमधील पहिली सेमी-फायनल दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानदरम्यान खेळली जाणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वाजता त्रिनिदाद येथे हे सामना होईल.   

Jun 26, 2024, 20:57 PM IST

टी-20 वर्ल्डकपमधील पहिली सेमी-फायनल दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानदरम्यान खेळली जाणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वाजता त्रिनिदाद येथे हे सामना होईल. 

1/10

टी-20 वर्ल्डकपमधील पहिली सेमी-फायनल दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानदरम्यान खेळली जाणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वाजता त्रिनिदाद येथे हे सामना होईल.   

2/10

तर दुसरा सेमी-फायनल सामना भारत आणि इंग्लंडदरम्यान 27 जूनला रात्री 8 वाजता खेळला जाणार आहे.   

3/10

त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न आहे की, जर खराब हवामान किंवा पावसामुळे हा सामना रद्द झाला तर फायनलमध्ये कोण खेळणार? जाणून घ्या काय आहे नेमका नियम  

4/10

अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकामधील सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.   

5/10

दुसरीकडे भारत आणि इंग्लंडमधील सेमी-फायनलसाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. याऊलट 4 तास 10 मिनिटांची अतिरिक्त वेळ ठेवण्यात आली आहे.   

6/10

जर पावसामुळे सामना रद्द झाला तर 'सुपर 8' मध्ये टॉपवर राहिलेला संघ फायनलमध्ये पोहोचेल.   

7/10

म्हणजे जर सेमीफायनल सामना झालाच नाही तर ग्रुप 1 मध्ये टॉपला असलेला भारत आणि ग्रुप 2 मधील दक्षिण आफ्रिका संघ अंतिम सामन्यात दाखल होईल.   

8/10

फक्त निकालासाठी खेळवावं लागलं तर सेमी फायलनमध्ये प्रत्येक संघाला 10 ओव्हर्स खेळावे लागतील. दुसरीकडे ग्रुप सामने आणि अन्य टी-20 सामन्यात 5 ओव्हर्स खेळणं अनिवार्य असतं. निकाल लागावा यासाठी हे केलं जातं.   

9/10

सेमी फायनलमध्ये राखीव दिवस असला तरी जर ओव्हर कमी केल्यानंतरही सामना पूर्ण होऊ शकला नाही तरच तो लागू होईल.   

10/10

पहिल्या सेमी फायनलमध्ये दिवसाच्या शेवटी 60 मिनिटं आणि राखीव दिवशी 190 मिनिटं असतील. तसंच राखीव दिवसाला खेळ जिथे संपला तिथूनच पुन्हा सुरु होईल.