उष्णतेचा कहर! वॅक्स म्युझियममधील अब्राहम लिंकन यांचा मेणाचा पुतळा वितळला

अमेरिकेत सूर्य आग ओकत आहे. भयानक उष्णतेमुळे मेणाचा पुतळा वितळला आहे.  

| Jun 26, 2024, 17:53 PM IST

Abraham Lincoln wax statue melts in Washington DC : सध्या भारतासह जगभरात उष्णतेचा कहर पहायला मिळत आहे. जगभरात अनेक देशात उष्णतेची लाट आली आहे. जगभरात उष्माघाताचे अनेक बळी जात आहेत.  अमेरिकेलाही उष्णतेचा जबरदस्त तडाखा बसला आहे. उष्णतेमुळे वॅक्स म्युझियममधील अब्राहम लिंकन यांचा मेणाचा पुतळा वितळला आहे. याचे फोटो व्हायरल झाले आहेत. 

1/7

जगभरात उष्णेतने कहर केला आहे. अशातच वॅक्स म्युझियममधील अब्राहम लिंकन यांचा मेणाचा पुतळा वितळला आहे. 

2/7

 नानफा कल्चर डीसीने बांधलेले, हे स्मारक गॅरिसन एलिमेंटरी स्कूलच्या मैदानावर येथेच मोकळ्या जागेत राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचा मेणाचा पुतळा उभारण्यात आला आहे. 

3/7

व्हर्जिनियातील मूर्तीकार सँडी विल्यम्स यांनी  अब्राहम लिंकन यांचा 6 फूट उंचीचा मेणाचा पुतळा उभारला आहे.

4/7

उष्णतेमुळे पुतळा वितळला असून पुतळ्याच्या आतील तारेचा ढाचा बाहेर दिसत आहे. हा पुतळा दुरुस्त करण्याचे काम सुरु आहे.   

5/7

अमेरित सध्या तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. मेणाचा पुतळा वितळला यावरुन उष्णतेची दाहकता लक्षात येत आहे.   

6/7

उष्णेतमुळे अब्राहम लिंकन यांच्या मेणाच्या पुतळ्यालाही तडे गेले आहेत.  पुतळ्याचे वरचे टोक वितळून मान वितळून डोकं खाली झुकलं आहे. 

7/7

अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसीमध्ये असलेल्या वॅक्स म्युझियममध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचा मेणाचा पुतळा आहे.