सोलापूर : सोलापूरचे आयुक्त पी. शिवशंकर हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. शहरातली कोरोना परिस्थिती हाताळत असताना आयुक्तांचाच रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे 27 जून रोजी गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे तसेच जिल्हाधिकारी आणि इतर महत्वाच्या नेते आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ते देखील उपस्थित होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे काल 28 तारखेला त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोलापुरात कोरोनाचा पहिला रुग्ण आणि पहिला बळी 12 एप्रिल रोजी गेला होता. पण ३ महिन्यात परिस्थिती आता नियंत्रणात आणताना प्रशासनाची चांगलीच कसरत होत आहे. जिल्ह्याचा ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे.


सोलापूर शहरात कोरोनाची स्थिती नियंत्रणात आणण्याची जबाबदारी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्यावर आहे. पण आता त्यांनाच कोरोनाची लागण झाल्यामुळे प्रशासनाचं आव्हान आणखी वाढणार आहे.